पान:लंकादर्शनम्.pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२

युरोपियन तरुण आणि तरुणी यांचा घोळका तेथे आलाच होता. एक युवती दोघां तरुणाबरोबर आली होती ती स्वस्थ उभी न राहतां हळू हळू नाचू लागली. आमच्या बरोबरच्या एक दोन लहान मुलांनी तिचे अनुकरण करण्यास सुरवात केली. इतक्यांत अतिशय जोराचा पाऊस आला. पाऊस थांबेपर्यंत तेथे उभे राहिल्यावर आह्मी मुक्कामास परत आलो. खाणावळींत जाऊन मंडळी जेऊन आली. मी व मि. वाघ पुन्हां मि. कारखाननीस यांचेकडे गेलो. मि. कारखाननीस हे फारच चांगले गृहस्थ आहेत. हिंदुस्थानांतील कोणीही माणूस त्यांचेकडे गेला तर त्याला ते सर्व तव्हेने मदत करतात. त्यांनी आह्मांस मोटार पाहून दिली व त्यांचे एक स्नेही श्रीयुत जयासंग यांस आह्मांस कोलंबोमधील प्रसिद्ध ठिकाणे दाखविण्यास सांगितले. रात्री ११ वाजतां आह्मी परत आलो.

 दुसरे दिवशीं गांवांत सकाळीं इकडे तिकडे फिरल्यावर जेवणे आटोपली व तीन वाजेपर्यंत विसावा घेऊन तीन वाजतां मोटारींत बसून बाहेर पडलो. सेक्रेटरियेट बिल्डिंगजवळ श्री. जयासंग आह्मांस येऊन मिळाले त्यांना त्या दिवशीं शनिवारची दुपारची सुटी होती.

 प्रथमतः आह्मी प्राणिसंग्रहालयांत गेलो. तेथे प्रत्येक माणसी ४ आणे फी द्यावी लागते. हत्ती, सिंह, माकडे, अस्वली, वाघ वगैरे जनावरे तेथे आहेत. मोठमोठ्या सुसरीही आहेत. काळे वाघही २॥३ आहेत. एका पेटा-यांत सीलोनमधील सुमारे ४०/५० नाग एका कपाटांत ठेविलेले आहेत. तसेच एका कपाटांत १८८ पौंड वजनाचा २७ फूट लांबीचा बोआ नांवाचा सर्प आहे. या ठिकाणी सीलोनमधील रत्नांचे एक दुकान आहे. तेथून आम्ही म्यूझियममध्ये आलो. म्यूझियममध्ये सीळोनी स्त्रियांचे अलंकार, बुद्धाच्या नाना त-हेच्या मूर्ति, ग्रेफाइटचे नमुने, सीलोन मध्ये प्राचीन काळी ज्या भुतांचे व राक्षसांचे अर्चन करीत त्यांच्या मूर्ति पूर्वीच्या राजवाड्याचे दरवाजे वगैरे वस्तु प्रेक्षणीय आहेत. एका राक्षसाने