पान:लंकादर्शनम्.pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



११

आला व मी तुमची राहण्याची सोय लावतो असे म्हणू लागला. तो विश्वासास पात्र असा दिसेना ह्मणून मि. वाघ यांनी त्यास आम्हाला तुझी गरज नाहीं आली तुझ्याबरोबर येत नाहीं असें निक्षून सांगितले पण तो जाईना. सारखा आमच्या मागे लागला. शेवटी त्यास दरडावून हाकून लावावे लागले.

 वेलावटि येथे कापडाच्या गिरणींत श्री. माधव गोपाळ कारखाननीस नांवाचे महाराष्ट्रीय गृहस्थ हेडक्लार्क आहेत असे आह्मांस रामेश्वरीं कळाले होते. तेव्हां सर्व मंडळीस स्टेशनवर सोडून मी व मि. वाघ वेलावटीकडे निघालों, वेलावटी कोणीकडे आहे. याचा तपास करून मोटारीतून वेलावटास गेलो. मोटारीतून उतरून गिरणीचा तपास करू लागलो. ऊन बरेच होते. रात्री प्रवास झालेला, अंगांत जाड कोट यामुळे मला चालवनः आशाळभूतपणाने चोहोकडे टांगा पाहूं लागलो पण जेथे टांगा नाहीं तेथे मिळतो कुठला १ मि. वाघ जलदीने चालत मी मागें रेंगाळे असें करितां करितां गिरणी सांपडली पण हेडक्लार्क आजारी असल्यामुळे घरी होते. पुन्हां त्यांच्या घराचा तपास करीत त्यांचेकडे गेलो. पायाचे तुकडे पडले. श्रीयुत कारखाननीस घरीच होते त्यांनी चहा व धिरड दिली. फराळ झाल्यावर जरा बरे वाटले. नंतर त्यांनी आम्हांस एक ट्रारंग मोटार व एक मनुष्य बरोबर दिला व त्यांस आम्हांला खानावळ व धर्मशाळा दाखविण्यास सांगितले. मोटार घेऊन आह्मी धर्मशाळेकडे गेलो. मी खाणावळवाल्यास जेवण तयार करण्यास सांगितले. श्री. वाघ स्टेशनवर गेले व मंडळी घेऊन आले. यावेळी १ वाजून गेला होता सर्व मंडळी दमली होती पण लागलीच जेवण मिळाल्यामुळे ठीक झाले, जेवणास प्रत्येकी ३० सेंट दिले.

 दुपारी विसावा घेऊन ५॥ वाजतां बंदरावर गेलो. वाटेंत जव्हेरीच्या दुकानांत शिरून मी खड्याबद्दल ( सीलोनी रत्ने ) तपास केला व केवळ नाद ह्मणून सुमारे ३० रु. खर्च केले. कोलंबो बंदर अगदी सुरेख आहे.