पान:लंकादर्शनम्.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०९

 देवळांकडे जाण्यास मोटारी व वाटाडे मिळतात.

 कोलंबोहून कॅडीस जातांना बहुधा हत्ती दृष्टीस पडतात. हे हत्ती लोकांनी शेतावरील कामाकरिता बाळगलेले असतात. कॅडीजवळील नदींत 'कटुगस्तोला' येथे सायंकाळी ३ ते ५ चे दरम्यान पुष्कळसे हत्तीस स्नानाकरितां आणितात. त्यावेळी या प्रचंड प्राण्यांची जलक्रीडा पहाण्या सारखी असते.

 कॅडी येथील रविवारचा बाजार, तसेच येथील ट्रिनिटि कॉलेज व बुध्द भिक्षूचे विहार पहाण्यासारखे आहेत. कॅडी येथे मुक्काम ठेऊन रबर, कोको, चहा यांचे मळे, नारळाच्या बागा व तेल काढण्याचे कारखाने बघतां येतात. कॅडी हा सिंहली शब्द आहे या शब्दाचा अर्थ टेकडी असा आहे. अर्थात् कँडी-ह्मणजे टेकडी जवळील गांव, कॅडियन लोक ह्मणजे डोंगरी लोक.

शिगिरी

 एका टेकडीवर अगदी सरळ ४०० फूट उंचीचा असा हा एक खडक आहे. वरच्या बाजूला सुमारे एक एकर अगदी सपाट जागा आहे. या खडकाच्या सर्व बाजू अगदी बरोबर कापल्या सारख्या आहेत. फक्त पूर्वेच्या बाजूने चढण्यास अत्यंत कठीण अशी एकच वाट आहे.

 दत्तुसेन राजाचा त्याच्या मुलानें खून केला व नंतर तो 'पहिला काश्यप' असे नांव धारण करून (दत्तसेनाचा मुलगा) राज्य करूं लागला. प्रजेने या पितृघातकी राजाविरूद्ध बंड केले व त्यास राज्यत्याग करावयास भाग पाडले. नंतर या काश्यपाने शिगिर येथे किल्ला बांधून इ.स. ४९५ पर्यंत राज्य करण्याचा प्रयत्न केला. पुढे काश्यपाचा भाऊ मोग्गलान हा हिंदुस्थानांत आपले हद्दपारीचे दिवस घालवीत होता तो परत सिंहलद्वीपांत आला व त्याने काश्यपास पदच्युत करून राज्य मिळविले.

 या शिखरावर दगडाचे एक सिंहासन आहे. या शिवाय विस्तीर्ण असे हौद आहेत, व अजिंठ्याप्रमाणे येथे उत्तम लेणी