वनश्री आहे. कॅंडीच्या शेवटच्या राजानें गांवाजवळील एका दरीचे तळे बनविलें, सांप्रत या तळ्याचे शेजारीच बुद्धाभिक्षुंचा मठ आहे. तळ्याचे दक्षिण अंगास बुद्धाचा दांत असलेले प्रसिद्ध देवालय व क्रीकेटचे क्रीडांगण आहे. या तळ्यांतही एक बेट होते व त्या बेटावर राणीनें कांहीं अपराध केला ह्मणजे राजा तिला कोंडून ठेवीत असे.
सन १८१५ साली कँडी इंग्लिशांच्या ताब्यात आले. त्यावेळी कॅडीच्या सरदारांस इंग्लिशांकडून कांही जहागिर देण्यांत आली. सीलोनच्या गव्हरनरांच्या हस्ते त्यांना पदके मिळालेली आहेत. ही पदकें सरदार लोक कांही विशिष्ट प्रसंगी धारण करतात. कॅंडीच्या सरदारांचा दरबारी पोषाख फारच थाटामाटाचा असतो. सुमारे ३० ते ४० वार लांबीचे जरीकांठीं शालू ते कमरेस बांधतात. डोक्यावरील पागोटे किंवा शिरोभूषणही मोठे विचित्र असते. भडक रंगाचे सुंदर जाकीट ते अंगांत घालतात. या सरदारांच्या अंगावर नानातऱ्हेची रत्ने असतात, ते आपले शरीर रत्नांनी मढवून काढतात असे म्हणण्यास हरकत नाही. या सरदारांच्या तरवारीच्या मुठीही रत्नखचित अशा आहेत.
कॅंडीच्या भोवताली उंच टेकड्या असल्यामुळे बशींत पडलेल्या माशीप्रमाणे हे शहर आहे असे वर्णन एका लेखकाने केले आहे. कोलंबोहून कॅंडीस मोटारने जाण्यास उत्तम डामरी सडक आहे. यूरोपियन प्रवाशाकारितां उत्तम हाटेल आहे. केवळ वनस्पत्याहारी लोकांकरितां ब्राह्मणाची खाणावळ आहे. ररते फारच चांगले असून इमारती सुंदर आहेत. येथे व्यापारही बराच मोठा चालतो.
जगांतील अत्यंत प्राचीन असे जे ऐतित्द्य अवशेष आहेत त्यापैकी भगवान् बुद्धाचा दांत हा एक आहे. कीर्तिश्री मेघवर्ण राजाचे कारकीर्दीत ३०४ ते ३२४ च्या सुमारास कलिंग देशाहून हा दांत सलोनमध्ये