पान:लंकादर्शनम्.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१०२

शाळा भरतात. ५ तासांपेक्षा जास्त शाळा चालविण्यास डायरेक्टरची मनाई नाहीं. वेळापत्रके, अभ्यासक्रम इत्यादि बाबतींत सुपरिंटेंडंटला शाळखाते सल्ला देते. १० वर्षाच्या आतील मुलांना दुपारी ४ नंतर शाळेत ठेवता कामा नये असा नियम आहे. दुवक्त पद्धतीनेही शाळा भरविल्या जातात.

 या मळ्यावरील शाळांना सरासरी हजेरीवर प्रत्येक मुलास ७ रु, प्रमाणें सरकारी ग्रँट मिळते. शाळेच्या परीक्षांच्या निकालावरही ग्रँट मिळते.

 सिंहली शिक्षकांची सातवी यत्ता तरी पास झालेली असावी लागते. हिंदुस्थानांतून मद्रासी शिक्षकही सीलोनमध्ये पुष्कळ जातात. अनपास शिक्षकास वार्षिक पगार २४० रु. मिळतो, ट्रेड शिक्षकास ४८० पर्यत पगार मिळतो. दुवक्त पद्धतीने शिकविणाऱ्या शिक्षकास जास्त पगार मिळतो.

 इस्टेटीवरील शाळांत पांच यत्ता पर्यंत शिक्षण मिळते. ज्या ठिकाणी शाळा नसल्यामुळे किंवा शाळा फार दूर असल्यामुळे मुलांस शाळेत पाठवितां येत नाहीं तेथें मुलांची शिक्षणाची सोय 'खासगी पद्धतीने केली आहे' अशी पालकास डायरेक्टरची खात्री पटवावी लागते. एवंच कोणतेही मूल निरक्षर राहूं नये याबद्दल सीलोन सरकार काळजी घेतें असे दिसते.

सिंहलद्वीपांतील प्रसिद्ध शहरे व प्रेक्षणीय स्थळे

 येथपर्यत सीलोनची शेतकी, त्यांत होणारी नानाप्रकारची पिके, खनिज संपत्ति इत्यादि विषयांची माहिती दिल्यानंतर या पुढे प्रेक्षणीय शहरें व स्थळे यांचे वर्णन दिलेले आहे. या वर्णनावरून मुख्य मुख्य शहरांबद्दल वाचकांस माहीती मिळेल.

 कोलंबोः– हें सीलोनमधील मुख्य शहर आहे. तेथील लोकसंख्या २|| लाखावर आहे. रस्ते मोठाले असून डामरी आहेत. लहान गल्या मात्र आपल्याकडील रस्त्याप्रमाणे खडीच्या आहेत. शहराच्या जुन्या भागांत