पान:लंकादर्शनम्.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०१

 ( ब ) दररोजचे हजेरी पत्रक बरोबर ठेविले पाहिजे.

 ( ३ ) मुलें दररोज शाळेत पाठविण्याची जबाबदारी पालकांवर असते.

  ज्या ठिकाणी २५ मुले नाहीत अशा मळ्यांतील मुलांनी शेजारच्या गांवच्या शाळेत जावे, किंवा दोन मळेवाल्यांनीं डायरेक्टरची मंजुरी घेऊन समाईक शाळा चालवावी. मुलांना कित्येकदां २ ते ३ मैल पर्यंतही शाळेकरितां जावे लागते.

 कायद्याची अंमलबजावणी बरोबर व्हावी म्हणून पुढील प्रमाणे शिक्षाही ठरविल्या आहेत.

 ( १ ) पालकांनी मुलें पाठविली नाहीत तर त्यांना दंड होतो.

 ( २ ) रजिष्टरे बरोबर राखिलीं नाहींत तर शिक्षक व सुपरिंटेंडंट हे दंडास किंवा शिक्षेस पात्र होतात. दंड २० रु., शिक्षा १ महिना.

 ( ३ ) सुपरिंटेंडंटने शाळागृह बांधून देण्याची टाळाटाळ केली तर गव्हरनरला कोणीतरी अधिकारी नेमून शाळागृह बांधवून घेतां येते व झालेला खर्च मळेवाल्यांच्या मालावर जप्ति नेऊन वसूल करितां येतो.

सामानः--

 ( १ ) शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाकरितां डेस्क व बेंच असलेच पाहिजे असा नियम आहे. या नियमाची बजावणी इन्फंट क्लासाबाबत मात्र सक्तीने केली जात नाहीं.

 ( २ ) पुस्तके, नकाशे वगैरे शाळेला सुपरिंटेंडंटने पुरवावीत असा नियम आहे.

 शाळांची वेळः-दहा वर्षाच्या आतील मुलाला मळ्यावर कोणतही कामास लावण्याची मनाई आहे. म्हणून सुमारे ८ ते १ पर्यंत (५ तास)