पान:लंकादर्शनम्.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९७

जातात. प्रत्येक मजूरामागे मजूरभरत्यास पैसा देऊन मजूरांस सीलोनमध्ये पाठविण्यास मदत केली जाते असे दिसते. मजूरभरत्यांच्या भलत्या थापांना भुलून कित्येकदां सुशिक्षित लोकही मजुरांमध्ये सांपडतात. सन १९१३ मध्ये एका महाराष्ट्रीय गृहस्थाचे पत्र केसरींत प्रसिद्ध झाले होते व त्याबद्दल नामदार परांजपे यांनी मुंबई सरकारास प्रश्नही विचारले होते.

 मजुरांच्या सुखसोयीकरितां सीलोन सरकारने अनेक कायदे केले आहेत. उदाहरणार्थ किमान मजुरीचे दर ठरविले आहेत, मजुरांच्या चाळी कशा असाव्यात याचे नियम ठरविलेले आहेत, मुलांचे शिक्षण, स्त्रियांची प्रसूति, वैद्यकीय मदत, इत्यादि बाबीबद्दल कायदे आहेत परंतु बहुतेक कायदे पुस्तकांतच रहातात आणि मजुरांना अनेक प्रकारे त्रास भोगावा लागतो.

 आजारीपणांत औषध मिळत नाहीं. पुरेशी मजूरी पदरात पडत नाहीं एवढेच नव्हे तर कर्ज वाढतच जाते आणि या कर्जामुळे स्वदेशी परत येता येत नाही व मळ्यांतील जीवन अत्यंत कष्टमय होते. मजुरांच्या स्थितीबद्दलची प्रत्यक्ष पहाणी करून अनेक लोकांनी वरीलप्रमाणे वस्तुस्थितीचे चित्र रेखाटलेले आहे.

 आम्ही सीलोनमध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष मजुरांच्या चाळींत जाऊन प्रत्यक्ष स्थिति अवलोकन करणे व ८|१० वर्षांपूर्वी मजुरांची जी स्थिति होती तिच्यांत कांही बदल झाला आहे की नाही हे पहाणे आम्हांस शक्य नव्हते; म्हणून जे जे हिंदी व सीलोनी सुविद्य असे लोक भेटले त्यांचेजवळ मजुरांच्या स्थितीबद्दल आम्ही चौकशी केली. चौकशी करितांना बहुतेकांनी अलीकडे धोडी सुधारणा झाली आहे असे सांगितले.

 सांप्रत व्यापारधंद्यांत थोडी पिछेहाट झाल्यामुळे सीलोन मधून बरेच मजूर स्वदेशी परत जात आहेत. आझांस दररोज सीलोन मधून परत जाणारे मजूरांची गाडी दिसे, त्या गाडीत विवस्त्र, कृशे आणि सर्वप्रकारें