पान:लंकादर्शनम्.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९३

जातांना इजा करील एवढेच. हिंदुस्थानांतून निरनिराळ्या वेळी इतकी रत्ने वा मोत्ये हिंदुस्थानांतून परक्या लोकांनी लुटून नेली आहेत की त्यांची इतिहास अत्यंत मवाळ अशा हिंदी तरुणास संतप्त करील असा आहे.

ग्रेफाइट किंवा प्लंबॅगो.

 परमेश्वराने सीलोनला ज्या अत्यंत मूल्यवान् देणग्या दिल्या आहेत त्यापैकी प्लंबॅगो धातू ही होय. प्लंबॅगोपासून शिसपेन्सिली करतात. प्लंबॅगो व शिसे यांचा अर्थाअर्थी कांहीएक संबंध नाहीं. सीलोनमध्ये १५० पेक्षा जास्त प्लंबॅगोच्या खाणी आहेत. सीलोनमधील ग्रेफाइट इतकें उत्तम व शुद्ध ग्रेफाइट जगांत कोठेच सांपडत नाहीं.

 इलीझाबेद राणीच्या वेळीं यूरोपमध्ये प्रथमतः ग्रेफाइट उपयोगांत आले आणि ग्रेफाइटची पहिली खाण कंबरलंड येथे सांपडली; व १६६३ च्या सुमारास या धातूपासून पेन्सिली होऊ लागल्या. यंत्राचे निरनिराळे भाग अत्यंत मऊ राखून त्यांमधील यांत्रिक घर्षण ( Mechanical Friction.) कमी करणे या धातूने सुलभ झाल्यामुळे यंत्रशास्त्रांत एक प्रकारची क्रांति झाली आहे.

 हिंदुस्थानांत त्रावणकोर, तिनेवेल्ली, विजगापट्टम्, कृष्णा व गोदावरी यांच्या कांठचा प्रदेश येथे ग्रेफाइट सांपडते. ज्या धंद्यांत ग्रेफाइटचा उपयोग होतो त्या धंद्याबद्दल हिंदुस्थानांत अज्ञान असल्यामुळे हिंदुस्थानाला या संपत्तीचा उपयोग करून घेता आला नाहीं. कोरियामध्ये ग्रेफाइट सांपडते, परन्तु ते अशुद्ध असते; यामुळे जपानची फार मोठी मागणी सीलोनला पुरवावी लागत असे. परन्तु अलीकडे जगांतील भिन्न भिन्न भागीं नव्या खाणी खणण्याचे काम चालू आहे, शिवाय कृत्रिम ग्रेफाइटही तयार होऊ लागलें आहें.

 कोलंबो येथील म्यूझियममध्ये ग्रेफाइटचे नमुने ठेविले आहेत. आम्ही