पान:लंकादर्शनम्.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९२

सध्या उत्तम आफ्रिकन हिऱ्याचा भाव २५० ते ३०० रु. कॅरट असा आहे*

 अमेरिकेंत न्यूयार्क शहरीं म्यूझियम मध्ये ४००० निरनिराळ्या जातींची रत्ने एकत्र ठेविलेली आहेत. त्यापैकी एका रत्नावर कुराणांतील २००० शब्द असलेला एक सुरा लिहिलेला आहे. या समूहांत हिंदतारा (Star oi India) नांवाचे सीलोनी रत्न ५४३ कॅरट (९ तोळे) वजनाचे आहे. दुसरें एक सीलोनमधील रत्न आहे त्याचे वजन ६१५ कॅरट आहे. आजपर्यंत जी रत्ने पृथ्वीच्या उदरांतून मनुष्याच्या हाती लागली, त्यापैकी आफ्रिकेतील न्यू प्रिमियर खाणींत सांपडलेलें क्युलियन रत्न सर्वांत मोठे होते. हे रत्न खाणींत सांपडले त्यावेळी त्याचे वजन ३०२५.७५ कॅरट ह्मणजे ५० तोळे होते. ते रत्न ट्रान्सवाल सरकारने १० लाख डालर्सला विकत घेऊन १९०७ साली मरहूम सातवे एडवर्ड बादशाह यांस नजर केले.

 ढेकणाच्या रक्ताने हिरा भंगत नाहीं. हिरकणी हे विष नाहीं. हिरकणी खाऊन आत्महत्या केली, अशा ज्या गोष्टी आपण वाचतो त्यावर विश्वास ठेवू नये. एखाद्या खड्याला तीव्र धार असली तर तो आतड्यांतून


  * अलीकडे विशेषतः जर्मनींतून कृत्रिम रत्ने फार येतात. त्यांची परीक्षा करितांनां हुषार जव्हेरीही फसण्याचा संभव आहे. हिरा पारखण्याच्या मुख्य रीति पुढे दिल्याप्रमाणे आहेत. (१) खऱ्या हिऱ्यास कानशीनें घासल्यास त्यावर खांच पडत नाही. (२) तोंडाने फुंकर घातल्यास आलेला ओलसरपणा खोट्या हिऱ्यावरील लवकर नाहीसा होत नाहीं, खऱ्या हिऱ्यावरील ओलावा ताबडतोब नाहीसा होतो. (३) एका बशीत पाणी घेऊन खरा हिरा आंत टाकिला तर त्याचे तेज कमी होत नाहीं. खोट्या हिऱ्याचे तेज कमी होते. (४) खऱ्या हिऱ्यावर पाण्याचा लहान बिंदु टाकून त्याला सुईने स्पर्श केला तर त्या बिंदूचा वर्तुळाकार मोडत नाही परंतु खोट्या किंवा कृत्रिम हिऱ्यावरील जलबिंदु पसरतो.