पान:लंकादर्शनम्.pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




 इतकी माहीती मिळाल्यावर पुढे आम्ही रामनड येथे गेलो.

 रामनड येथे आह्मीं सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास जाऊन पोहोंचलो. रस्ता बराच रेताड होता. रामेश्वर तेथून सुमारे १५ मैलावर होते त्यामुळे मोटारी जातील किंवा नाही याची शंका येऊ लागली. गांवाला लागूनच १ फर्लागावर तळे आहे त्या तळ्याच्या कांठी बरीच माणसे आह्मास दिसली ह्मणून आह्मी मोटारी थांबवून चौकशी करण्यास सरवात केली. तेव्हां तेथील एका तरुणाने आह्मांस मोटारी घेऊन जाऊ नका असा सल्ला दिला व आमची उतरण्याची सोय लावून देण्याचे कबूल केले. सीलोनमध्ये जाण्याचे काय नियम आहेत हे त्यांस नक्की ठाऊक नव्हते. ह्मणून गांवांत जाऊन तेथील वकील, डॉक्टर वगैरे मंडळीकडून माहीती मिळवावी ह्मणून आह्मी गांवांत गेलो. आह्मांस भेटलेला तरुण आमच्या बरोबर आला. गांवांत एका प्रसिद्ध वकीलाकडे जाऊन आह्ना माहीती विचारली. वकीलांनी दर माणसी ५० रुपये डिपाझिट देऊन सीलोनमध्ये जाण्याची परवानगी मिळविता येते असे आह्मांस सांगितले व शेवटीं मंडपम् येथे जाऊन अगोदर पूर्ण माहीती मिळवा असे सुचविलें; तसेंच रामेश्वरचा रस्ता आतिशय रेताड असल्यामुळे मोटारी नेतां येणार नाहीत असेही सांगितले.

 इतकी माहीती मिळाल्यावर आह्मी धर्मशाळेत जाऊन उतरलो. आह्मांस भेटलेल्या तरुणाने आमची सोय लावून दिली व आह्मी सालानहून परत येईपर्यंत आमचे सामान व मोटारी सांभाळण्याचे कबूल केले. रात्री फराळ आटोपल्यावर आमचे बेत सरू झाले. आह्मी एकंदर जवळ जवळ ४० जण होतो त्यापैकी सुमारे २० जणांनां सीलोनमध्ये जावयाचे होते. वीस जणाकरितां डिपााझट कमीत कमी दोन हजार ठेवण्याची पाळी येणार तेव्हां कसे करावे हा प्रश्न उत्पन्न झाला. केवळ डिपाझिट ठेवण्याकरितां शिल्लक नव्हती ह्मणून स्त्रियांच्या अंगावर