पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केली. कुणावर अन्याय होऊ नये म्हणून पुढे व्हायला हवे हे कधीतरी सांगितलेले त्याने लक्षात तर ठेवलेच, पण आचरणातही आणले.
 दुसऱ्या एका मुलींच्या गटाचा अनुभव तर आणखी वेगळा. प्रबोधिनीत विद्यार्थी प्रकल्प पद्धतीने शिकतात. वेगवेगळ्या विषयांची निवड करून, वाचून, प्रत्यक्ष प्रयोग करून विद्यार्थी त्यातून काहीतरी सिद्धही करत असतात. साखरशाळेत जाऊन आल्यामुळे अशा प्रकारच्या कामांमध्ये आपणही सहभाग वाढवावा असे वाटल्याने विद्यार्थिनींनी जवळपास शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांची मुले दिवसभर तिथेच खेळताना दिसली. त्यांनी हाच प्रकल्पाचा विषय निवडला आणि रोज संध्याकाळी शाळा सुटल्यावर दोन तास या मुलांना शिकवायला सुरुवात केली.
 कुठल्याही शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते ती त्यातील सातत्याची साखळी जोडलेली राहणे. या अनुभवांतून हे सातत्य टिकून आहे हे लक्षात येते अन् कामाचा उत्साह द्विगुणित व्हायला लागतो.






(६०)रूप पालटू शिक्षणाचे