आनंद घेतात. संगीताचे राग ओळखतात, आकाशदिवे करतात.
५. विश्रांती व ताण यांच्यामधील सुखद स्थिती म्हणजे या तासिका.
६. स्वत:च्या कलाप्रमाणे, आवडीनुसार अभिव्यक्तीची निवड करण्यास
मिळाल्यामुळे विद्यार्थी आनंदी व उत्साही असतात.
७. गटात मर्यादित विद्यार्थी असल्यामुळे शिक्षक वैयक्तिक लक्ष देऊ शकतात.
८. हात, मन, बुद्धी यांतील एकाग्रता, प्रतिभा विकसित करते.
९. जे विद्यार्थी १९९०-९१ या प्रारंभीच्या अभिव्यक्ती गटात शिकले, त्यांना या
तासिकांमुळे प्रेरणा मिळाली. त्यांतील काहीजण वास्तुकला, व्यावसायिक
चित्रकला, संगीत, गृहसुशोभन, नाट्यक्षेत्र यांचे अभ्यासक्रम घेऊन उच्च
शिक्षण घेत आहेत.
अभिव्यक्ती विकसनातील माझे प्रयत्न व प्रयोग : एक अध्यापिकेचे निवेदन
चित्रकला, फलकलेखन, हस्ताक्षर या माध्यमांविषयीचे मार्गदर्शन मी केले होते.
त्याविषयी काही सांगू इच्छिते.
१. तात्त्विक मांडणी :- लहान मूल जेव्हा हातात खडू,पेन्सिल पकडते, तेव्हा
काही वेडेवाकडे आकार, रेषांचा गुंता, - पाटी, भिंत, कागद यांवर काढते. तेव्हा
काय व कसे काढावे हे तंत्र त्याला माहीत नसते. पण मनातील अस्पष्ट आकार
माध्यमाच्या द्वारे स्पष्ट करण्याचा तो प्रयत्न असतो. त्याची ही कृती उत्स्फूर्त असते.
प्राथमिक स्थितीत मुलांना त्यांच्या आवडीनुसार, कल्पनेप्रमाणे चित्र काढण्यास
मोकळी संधी द्यावी लागते. अभिव्यक्त होण्याची गरज चित्रकलेतून भागत असते.
चित्रकला ही मुलांची भाषाच बनते.
२. मनातील जास्तीत जास्त कल्पना मुले चित्रातून स्पष्ट करतात :-
मानसतजज्ञांनी लहान मुलांच्या चित्रांचा केलेला अभ्यास अगदी वेगळे निष्कर्ष समोर
आणतो. ती चित्रे मुलांच्या विचित्र अभिव्यक्ती दाखवतात. मुलांचे शिक्षण न झाल्याचे
चिह्न स्पष्टपणे त्या चित्रांमध्ये दिसते, सुंदर, असुंदर गोष्टींबाबतची अजाणता, हाताचे
शैथिल्य, खरे-खोटेपणाबद्दलचे अज्ञान या चित्रातून दिसते. पण असे सुरुवातीचे
स्वाभाविक रेखाटन ही मुलांची चित्रकलेतील मुळाक्षरेच असतात.
चित्रकला हा विषय असा आहे, जो बहुसंख्य मुलांना आवडतो. रेषा व रंग यांची
जादू चित्र काढणाऱ्याला चित्रचौकटीत बांधून टाकत असते. मुले कोणत्या विषयावर
चित्रे काढतात ? कोणत्याही आणि शिक्षक सांगतील त्या विषयांवर चित्रे काढली
जातात. विषय एक असला तरी त्याकडे बघण्याची आणि तो रेखाटण्याची पद्धत
रूप पालटू शिक्षणाचे (४७)