पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

क्रीडासंघटक, क्रीडामार्गदर्शक, क्रीडाक्षेत्रातील शासकीय अधिकारी यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.
सद्य:स्थिती
 * सलग बारा वर्षे यशस्वी संयोजन
 * पिंपरी-चिंचवड परिसरातील ८०% शाळांचा सहभाग
 * नवनगर विद्यालयातील व परिसरातील शाळांमधील अनेक शिक्षकांना खेळांतील नियमांचे अद्ययावत प्रशिक्षण
 * दर वर्षी पाच हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग
 * क्रीडा विभागातील कार्यकर्त्यांच्या ज्ञान, अनुभव, कल्पकता, कार्यवाही व इतर क्षमतांमध्ये ठोस वाढ
 * क्रीडा क्षेत्रातील पन्नासपेक्षा अधिक तज्ज्ञ व्यक्तींची विद्यालयास भेट व त्यांच्याशी दृढ संबंध प्रस्थापित झाले आहेत.
फलनिष्पत्ती
 पिंपरी-चिंचवडमधील काही शाळांमधून प्रशिक्षित शारीरिक शिक्षण शिक्षक आढळत नाहीत. असे शिक्षक आवर्जून स्पर्धांमध्ये आपले संघ पाठवितात. आपल्या खेळाडूंना कसे प्रशिक्षण द्यावे, स्पर्धांचे संयोजन कसे करावे, क्रीडासाहित्य कोणते वापरावे, ते कसे उपलब्ध होईल, विविध शासकीय क्रीडा अनुदाने कशी मिळवावी, मैदाने कशी तयार करावी, आखणी कशी करावी, इत्यादी माहिती या स्पर्धांच्या निमित्ताने मिळवितात.
 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेसुद्धा या क्रीडामहोत्सवातून प्रेरणा घेऊन महानगरपालिकेच्या तसेच खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी कला व क्रीडा विकास प्रकल्प सुरू केला आहे. कला व क्रीडा विकास प्रकल्पातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा आवर्जून आपला सल्ला व मदत घेतात.  या स्पर्धांमधील संयोजनाच्या अनुभवाद्वारे आपण शासकीय स्पर्धासुद्धा तेवढ्याच जबाबदारीने व कुशलतेने घेत असतो. शासनाच्या स्पर्धांमध्येसुद्धा पुणे शहराच्या तुलनेत ८०% खेळाडूंचा सहभाग पिंपरी-चिंचवड परिसरातील खेळाडूंचा असल्यामुळे स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळविण्यात आपल्याला यश मिळाले आहे. गेली ९ वर्षे आपण शासनाच्या तालुका पातळीवरील व गट पातळीवरील अॅथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल या स्पर्धांचे आयोजन करतोच पण गेली २ वर्षे कबड्डी व खो-खो च्या जिल्हा पातळीवरील स्पर्धांचे यशस्वी आयोजन करीत आहोत.
भावी योजना
 * विविध क्रीडा संघटनांमध्ये आपले शिक्षक, खेळाडू पदाधिकारी म्हणाली



रूप पालटू शिक्षणाचे (३१)