पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/३६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आज या स्पर्धांमध्ये शाळांच्या खेळाडूंप्रमाणे याद्या, क्रीडाप्रकारांनुसार खेळाडूंचे वर्गीकरण, स्पर्धाची निकाल नोंद, मागील उच्चांक, शाळांना त्यानुसार मिळालेले गुण इ. कामे झटपट,स्पर्धा चालू असतानाच (आंतरराष्ट्रीय स्पर्धाप्रमाणे) संगणकाच्या साहाय्याने केली जातात. पारितोषिक विजेत्यांची शाळानिहाय यादी, शाळांनुसार गुणदान, स्पर्धा विक्रम, प्रमाणपत्र लेखन इ. सर्व कामे संगणकाद्वारे केली जातात.
 डिसेंबर १९९९ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी याचा वापर यशस्वीरीत्या करण्यात आला. सर्व प्रशिक्षक, जिल्हा क्रीडाधिकारी तसेच क्रीडा संचालक श्री. अश्विनीकुमार यांनी या सॉफ्टवेअरचे कौतुक केले. आता हे सॉफ्टवेअर राष्ट्रीय स्पर्धाच्यासाठीही वापरण्याची तयारी करण्यात आली आहे.
 या सॉफ्टवेअरमुळे खेळांडूच्या सर्व प्रकारच्या नोंदी, नाव, विभाग, जन्मतारीख, क्रीडाप्रकार यांची बिनचूक नोंद राहाते. पुढील फे-यांसाठीची निवड परस्पर करता येते. स्पर्धा चालू असताना उच्चांक, गुणांकन सतत जाहीर करून स्पर्धेची चुरस वाढते. खेळाडूंचा झशीषीरपलश वाढणे, अधिक यशासाठी नेमकी आकडेवाडी प्राप्त होणे इ. महत्त्वाचे फायदे याच्या वापरामुळे होतात.
आयोजनात अनेकांचा सहभाग
 संपूर्ण सप्ताहामधील विविध स्पर्धाच्या आयोजनामध्ये पुणे जिल्हा कबड्डी संघटना, ईगल्स खो-खो क्लब पुणे, सन्मित्र संघ पुणे, बुद्धिबळ संघटना पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील विद्यानंद भवन, गोदावरी हिंदी विद्यालय, मॉडर्न हायस्कूल, विद्यानिकेतन, टेल्को या शाळांचे क्रीडाशिक्षक, ज्ञान प्रबोधिनी पुणे येथील युवक-युवती कार्यकर्ते, तसेच नवनगर विद्यालयातील क्रीडाशिक्षकांच्या बरोबरीनेच पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागांतील सर्व अध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, सेवक, युवक-युवती कार्यकर्ते प्रत्यक्ष क्रीडांगणावर किंवा क्रीडांगणाबाहेरील जबाबदारी आनंदाने सांभाळत असतात. ज्ञान प्रबोधिनीमध्ये क्रीडा हा एक संस्कार मानला जातो. त्यामुळे जणू सर्व क्रीडाप्रेमींचे या स्पर्धाच्या निमित्ताने एक क्रीडासंमेलनच भरलेले असते. प्रत्यक्ष क्रीडांगणावर खेळताना नियमांमधील असलेले बारकावे व त्यांची कार्यवाही लक्षात आल्यानंतर १९९५ साली पिंपरी-चिंचवड परिसरातील क्रीडा शिक्षकांसाठी अॅथलेटिक्स् पंच प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
 १९९६ साली विजेते, उपविजेते संघ तसेच वैयक्तिक क्रीडाप्रकारांमधील प्रथम तीन क्रमांक यांचा एकत्रित विचार करून पहिल्या चौदा शाळांना क्रीडासाहित्याच्या रूपाने पारितोषिके देण्यात आली, ज्यायोगे त्या साहित्याचा वापर अधिकाधिक खेळाडूंना होईल.
या क्रीडामहोत्सवाला सुमारे ५० आजी-माजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू,(३०)रूप पालटू शिक्षणाचे