Jump to content

पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वरीलपैकी एक किंवा अनेक मार्गांनी हा मागोवा घ्यावा. शिक्षकाने यासंबंधी एक प्रतिवृत्त लिहावे. त्यांत पुढील मुद्दांचा समावेश असावा.
 १) तांत्रिक माहिती
 २) उद्दिष्टे
 ३) त्या दिवशीचा कार्यक्रम
 ४) शिक्षकाने केलेली विशेष निरीक्षणे
 ५) कोणती उद्दिष्टे साध्य झाली / साध्य झाली नाहीत ? का ?
 ६) नवीन काही प्रश्न जाणवले व मनात आले का ?
 ७) एखाद्या जुन्या समस्येवर तोडगा लक्षात आला का ?
 ८) अभ्यासाची एखादी नवी पद्धती, मनुष्य स्वभावाचा नवा पैलू, नवे क्षेत्र, नवी साधने लक्षात आली का ?
 ९) मूळ योजनेत आलेल्या अडचणी, त्यांवर केलेले उपाय
 १०) पुढच्या काळात या प्रकारचा सहाध्यायदिन यशस्वी करण्यासाठीच्या सूचना
 ११) वर्गात घेतलेल्या मागोव्याचा सारांश व मुलांच्या प्रतिक्रिया





(२६) रूप पालटू शिक्षणाचे