पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ४) शासकीय संस्था - जलशुद्धीकरण केंद्र, पुणे महापालिका, जिल्हा परिषद, शासकीय कार्यालये, पोलीस मुख्यालय, न्यायालय, पुणे टेलिफोन, कारागृह, GPO, कृषिउत्पन्न बाजार समिती, रुग्णालये (ससून, जहांगीर इ.)
  ५) संग्रहालये- राजा केळकर संग्रहालय, संधिपाद प्राणी संग्रहालय, सर्पोद्यान, महात्मा फुले संग्रहालय इ.
२. समूह अभ्यास - १) परिसंस्थेचा (Ecosystem) अभ्यास २) धरणे, पाझर तलाव इ. ३) वनस्पती, प्राणी, दगड इ. जमा करणे व त्यांचा अभ्यास करणे ४) स्वत:च्या गावाचा परिचय ५) पक्षीनिरीक्षण ६) आकाशदर्शन ७) नदीच्या पात्राचा । प्रणालीचा अभ्यास
३. समाजाचा अभ्यास- १) ग्रामीण भागाचे सर्वेक्षण २) झोपडपट्टयांचे सर्वेक्षण
३) लघुउद्योगांचे सर्वेक्षण ४) एखाद्या प्रश्नाच्या / विषयाच्या अनुषंगाने सर्वेक्षण
४. व्यक्तींशी संवाद - १) कवी / लेखक / शास्त्रज्ञ / सामाजिक कार्यकर्ते / नेते | प्रशासकीय अधिकारी | खेळाडू यांच्याशी गप्पा व त्यांतून परिस्थितीची जाणीव २) एकत्रितरीत्या गटाने लेखन करणे ३) एखाद्या विषयावर परिसंवाद-चर्चा ४) व्याख्याने ऐकणे व त्यावर चर्चा ५) व्यावसायिकांच्या मुलाखती घेणे ६) अन्य प्रांतीय । अन्य भाषिक यांच्या मुलाखती घेणे.
५. कृतियुक्त उपक्रम - १) हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णसेवा करणे २) शेतात काम करणे, ३) कारखान्यात काम करणे ४) कारागिरांबरोबर काम करणे
५) दिवसभराचे श्रमकार्य करणे ६) पथनाट्ये सादर करणे ७) नव्या भाषेची प्राथमिक कौशल्ये शिकणे ८) नवी कौशल्ये शिकणे.
६. कलाकृतीचा आस्वाद - १) समूहात चित्रपट / नाटक पाहणे व त्यावर चर्चा २) एकत्र पुस्तक वाचणे व चर्चा ३) एकत्र प्रदर्शन पाहणे व चर्चा ४) प्राचीन शिल्प पाहणे, चर्चा व अभ्यास
 वर सुचविलेले अथवा अन्य उपक्रम सहाध्यायदिनासाठी योजता येतील.
सहाध्यायदिन पूर्वतयारी
  सहाध्यायदिनाच्या यशस्वितेत शिक्षक व विद्याथ्र्यांच्या मनापासूनच्या सहभागाचा मोठा वाटा असतो. हा उत्कट सहभाग बौद्धिक, मानसिक व प्रत्यक्ष कृतीच्या रूपाने व्यक्त होत असतो. असा सहभाग वाढण्यासाठी सहाध्यायदिनातील काही भागाचे पूर्वनियोजन चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे.



रूप पालटू शिक्षणाचे(२३)