पान:रुपक.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बापू : हॅऽ शोरूममधल्या पुतळयाच्या गळयात किमतीचं लेबल असतं,
 लावून जगणं शक्य नाही मला. हे घर म्हणजे शोरूम नाही
 आणि आपण पुतळे नाही आहोत त्यातले ! प्रत्येक गोष्ट तोलून
 मापून कधीच केली नाही मी, मला ते जमणारही नाही.
 (बेल वाजते, रूपा आलीय. लता दार उघडते.)
रूपा : येस मॉम, बॅप्स कुठंय ?
लता : तो काय समोर तर आहे तुझ्या.
रूपा  : ( उत्साहानं फसफसलेली) बॅप्स, बॅप्स ऽ ऽ
 (बापूचा प्रतिसाद नाही. तो रागावलेलाय तिच्यावर ) ओ बॅप्स,
 तू अजून दुर्मुखलेलाच का ? अरे, कंपनीत किनई गंमत झाली- -
बापू  : सांग तुझ्या मॉमला !
रूपा  : (खळखळून हसते ) हे मात्र अगदी लहान मुलासारखं झालं. बॅप्स,
 किती रे लडदू तू !
लता  : लडदू ? रूपा काय बोलतेस ?
रूपा  : मॉम, लडदू म्हणजे लाडू खाणाऱ्या मुलाच्या वयाचा
लता  : मग हरकत नाही. आम्ही ऐतखाऊ माणसाला म्हणतो लडदू !
रूपा  : बॅप्स, बघ मॉम काय म्हणते ते.
लता  : रूपा, अजिबात बोलू नको. आमच्यात भांडणं लावतीयस का ?
रूपा  : भांडणं काय? मी लाडू खाणारा लाडोबा म्हणत होते तर तू
 लडदूचा वेगळाच अर्थ सांगितलास.
लता  : रूपा, बापू चिडलेलाय अजून. माझ्याशीही नीट बोलत नाहीये ग तो.
रूपा  : लॅपटॉप पाहत) उफ, हे फोटो. मॉम काय मस्त आहे ग हा फोटो.
  (बापू तसा निवळत चाललाय )
लता  : ( उत्साहाने) हां, हां, तो होय. तो ना लडाखचा आहे.
बापू  : शूः ऽऽ उगीच काहीही काय सांगतेयस, मी लडाखला कधी गेलो होतो ?
लता  : घ्या, मी कुठं म्हटलं तसं? मी फक्त फोटो लडाखचाय असं म्हणाले !
रूपा  : क्या बात है ! मॉम, बर्फाच्या या लाद्या खरोखर किती फ्रेश
 वाटतायत ना. लडाखला जायला पाहिजे एकदा.

रुपक । २५ ।