Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुसन्या आवृत्तीस प्रस्तावना. वाढविलें पाहिजे ही महत्वाची गोष्ट लोकांच्या नजरेस अद्यापि येत नाहीं त्यामुळे धंदेशिक्षणाचें पाऊल पुढे सरत नाहीं ह्यांत नवल नाहीं. हल्लीं जे कांहीं थोडेबहुत धंदे चालू आहेत ते शास्त्रीय पायावर मुळींच रचलेले नसून केवळ अनुकरणाच्या तत्वावर चालू आहेत. सशास्त्र पद्धतीनें वैद्यशास्त्र न शिकतां इतर वैद्यांनी लिहिलेल्या औषधींच्या यादी पाठ करून वैद्यकीचा धंदा करणारास जसें दैवावर हवाला ठेवून अं- धारांत चापसत बसावें लागतें, तद्वत् रसायनशास्त्र न जाणणाऱ्या धंदे- शिक्षण संपादन करूं इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याची स्थिति असते. इंग्रजी शाळांतून, आर्ट्स, एंजीनीयरिंग, मेडिकल, टेक्निकल कालेजांतून रसाय- नशास्त्राचें जें शिक्षण दिले जातें तें फार अपुरें असतें; तें पुरे करण्याचीं साधनें उपलब्ध असत नाहींत. त्यामुळे तें लवकरच गंजून जाऊन नाहींसें होतें. प्रचारांत ज्या वेळीं पूर्वी मिळविलेल्या अपुण्या ज्ञानाचा उपयोग करावयाचा प्रसंग येतो त्या वेळीं तें विद्यार्थ्यास सोडून गेलेलें असतें. वर सांगितलेल्या संस्थांमधून जें रसायनशास्त्राचें शिक्षण दिले जातें तें इंग्रजी भाषेत दिलेलें असतें. त्याचा केवळ मराठी जाणणाऱ्या विद्या- थना मुळींच फायदा होत नाहीं. केवळ मराठीमध्ये शिक्षण देणाऱ्या, ट्रेनिंगस्कूलसारख्या संस्थांमध्ये हे विषय शिकवीत नाहींत. इतकेंच नव्हे, तर पूर्वीच्या पुस्तकांत शास्त्रीय धडे होते तेही आतां काढून टाकले आ- हेत !! अशा स्थितींत वंशपरंपरें चालत आलेले धंदे सुद्धां चालविण्याची व त्यांमध्यें इतर राष्ट्रांबरोबर बाजारांत व्यापारी टक्कर मारण्याची फार पंचाईत पडते. मग नवीन धंदे शिकण्याचें तर नांवच नको. मराठी वैद्यकाची सुद्धां हीच स्थिति. जुन्या मात्रा, जुनीं भस्में ह्यांचा कालांतरानें लोप होत चालला आहे. काही दिवसांनीं त्या पौराणिक वस्तू होतील कीं काय अशी भीति वाटते. मग अस्सल जुनी मात्रा नमुन्यादाखल सुद्धां मिळणार नाहीं. ह्या. मात्रांचें व भस्मांचें पृथक्करण करून नव्या, सोप्या, स्वस्त आणि सशास्त्र पद्धतीनें ह्या तयार करतां