Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
रासायनिक परीक्षण.

परीक्षकानें परीक्षा लावून आपली शंका दूर करावी, व एक निर्णय ठरवावा. कांचेच्या तुकड्यावर बसलेला सांका जळून काळा होईल, तर तो सेंद्रिय पदार्थाचा आहे असे समजावें.

 परीक्षणद्रवाची प्रतिक्रिया अॅसिड किंवा अल्काईन असेल, तर त्या द्रवांत-( प्रत्येक परीक्षा, टेस्ट ट्यूबमध्यें थोडासा द्रव घेऊन केली पाहिजे, हें आतां सुचविलें नाहीं तरी चालेल. ) – थेंब थेंब जलमि- श्रित हैड्रोक्लोरिक असिड घालावें. ह्या अॅसिडानें जर टेस्ट ट्यूबमध्यें पांढरा सांका बसेल, तर परीक्षणद्रवांत पहिल्या वर्गीतील धातु अथवा त्यांचे क्षार आहेत असे समजावें. पहिल्या वर्गीत रुपें शिसें, व पाऱ्याचे नीच ( सब ) जातीचे क्षार इतके येतात. ह्मणून पहिल्या वर्गास रजत ( रुप्याचा ) वर्ग, अशी संज्ञा दिली आहे. दिलेल्या द्रवांत पहिल्या वर्गातील धातू आहे असें ठरल्यानंतर, ती कोणती आहे हें ठरविलें पाहिजे. ह्मणून त्यांत लिकर अमोनिया ( अमोनिया विर- लेले पाणी ) थोडा थोडा घालावा. खालीं बसलेला पांढरा सांका विरघळेल, तर त्यांत रुपें आहे असे समजावें. सांका काळा होईल तर त्यांत पारा (मर्क्यूरी ) आहे. सांका जसा होता तसाच राहिल्यास शिसें आहे, असें मानावें. एवढ्यानें धातूचें जरी ज्ञान झालें, तरी स्वस्थ राहूं नये. प्रत्येक धातू ओळखण्याच्या कांहीं विशिष्ट परीक्षा आहेत; त्या सर्व करून पाहून अमुकच धातू आहे, अशी आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी आणि मग आपले मत द्यावें. त्या विशिष्ट परीक्षा खाली दिल्या आहेत.

 ह्या परीक्षा सोप्या जाव्यात ह्मणून एकंदर धातूंचे पांच वर्ग केले गेले आहेत. प्रत्येक वर्गीतील धातूंवर सामान्य कार्य होईल अशा

  • द्रव्यास त्या त्या वर्गाचा वर्गपरीक्षक ह्मणतात.

१ हा परीक्षक तयार करण्याची रीत पुढे सांगूं. २ शिसें सूक्ष्म प्रमाणांत असेल तर.