Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण दुसर्

.

करण्यासाठी त्यांतील थोडासा अंश वाफेच्या पाण्यात (शुद्ध पाण्यांत ) टाकावा ह्मणजे तो त्यांत बहुतकरून विरघळेल. जर कदाचित् शुद्ध पाण्यांत विरघळला नाहीं, तर त्या पाण्यांत थोडेंसें जलमिश्रित (डिल्यूट) हैड्रोक्लोरिक् अॅसिड घालावें; ह्मणजे कदाचित् तो पदार्थ विरघळेल. डिल्यूट अॅसिडांत न विरघळेल, तर शुद्ध हैड्रोक्लोरिक अॅसिडांत किंवा नैट्रिक अॅसिडांत, अथवा दोहोंच्या मिश्रणांत ( ह्या मिश्रणास अक्का- रीजिया ह्मणतात, ह्यांत ३ भाग हैड्रोक्लोरिक व एक भाग नैट्रिक अॅसिड असतें. ) तो पदार्थ विरवावा. तेवढ्यानें न विरल्यास ऊन करून विरवावा. एकंदरींत कसें तरी करून त्याचा द्रव तयार करावा. ( द्रव करण्यासाठीं कोणकोणते पदार्थ त्यांत घालावे लागले, त्यांचें टिप्पण करून ठेवावें ह्मणजे पुढें दिशाभूल होणार नाहीं. )
  येणेंप्रमाणें द्रव तयार झाल्यावर तो कोणत्या क्षाराचा द्रव आहे; ह्मणजे त्यांत कोणत्या व किती धातू आहेत, त्याचप्रमाणे त्यांत कोणत व किती अॅसिडें आहेत, ह्याचा निर्णय करण्याकडे वळले पाहिजे.

 दिलेला पदार्थ नुसत्या पाण्यांत विरघळला आहे असे समजून किंवा कोणीं तरी आयता द्रवच तयार करून आणला आहे अशी कल्पना करून त्याची लिटमसच्या कागदावर प्रतिक्रिया (Reaction) काय होते ती पहावी व टिपून ठेवावी. प्रतिक्रिया अॅसिड किंवा अल्काईन किंवा निर्विकारी [न्यूट्रल] असेल, तर त्याचे दोन तीन थेंब एका कांचेच्या तुकड्यावर टाकून आटवावे. आटविल्यानंतर जर कांचेवर डाग राहिला नाहीं व वास आला नाहीं, तर परीक्षणासाठी आलेला पदार्थ शुद्ध पाणी आहे असे समजावें. त्यांत अमोनिया असता, तर आटते- वेळीं त्याचा विशिष्ट वास आला असता. आटल्यानंतर पाठीमागें सांका बसेल व तो उष्णतेनें उडून जाईल, तर त्यांत फार करून नुसतें अॅसिड, आर्सनिक, अमोनिया किंवा पारा, अथवा ह्या पदार्थोचे क्षार असूं शकतील. ह्यापैकीं अमोनियाची शंका आल्यास, नेस्लरच्या