२४ रासायनिक परीक्षण. जनानें सांका बसतो, आणि सोडीयमच्या क्षाराच्या द्रवांत सल्फ्यूरेटेड. हायड्रोजनानें सांका बसत नाहीं. तीन ग्लास घ्यावेत. एकांत मोरचुदाचें पाणी घालावें, दुसऱ्यांत लोखंडाच्या सल्फेटचें (हिराकसाचें) पाणी घालावें, व तिसन्यांत मिठाचें पाणी घालावें, व त्या प्रत्येकांत हायड्रो- क्लोरिक अॅसिडाचे थेंब टाकून, मग तिन्ही ग्लासांत सल्फ्यूरेटेड हायड्रो- जन वायू विरवून तयार केलेले पाणी घालावें. ह्मणजे वर सांगितल्या- प्रमाणें तांब्याच्या सल्फाईडचा काळा सांका बसेल; पण दुसन्या दोन्ही ग्लासांतील द्रवांत कांहीं फरक होणार नाहीं. कारण, तिन्ही ग्लासांत हायड्रोक्लोरिक अॅसिड घालून, त्यांतील द्रवाची प्रतिक्रिया अॅसिड केलीं असल्यानें, तांब्याच्या द्रवावर मात्र कार्य झालें. आतां सल्फ्यूरेटेड हाय- ड्रोजनाचे पाण्यानें कार्य न झालेल्या दोन्ही ग्लासांत, कॉस्टिक पोट्याशचें अगर कॉस्टिक सोड्याचें पाणी घालावें, ह्मणजे लोखंडाच्या सल्फाईडचा काळा सांका बसेल. कारण, द्रवांत कॉस्टिक पोट्याशनें अगर कॉस्टिक सोड्यानें अल्कलाइन प्रतिक्रिया आणली. राहिलेल्या मिठाच्या द्रवावर सल्फ्यूरेटेड हायड्रोजनानें कार्य होत नसल्याने, त्याचे अॅसिड अगर अलकली द्रवावर कांहीं कार्य होणार नाहीं. सोडियम हायड्रेट ( कॉस्टिक सोडा ). - १. सामुग्री – दोन बाटल्या, कढत पाणी, कार्बनेट आफू सोडा, ( पापडखार, ) चुना (कळीचा ), लोखंडी कढई, लहान रिटॉर्ट- स्ट्यांड, दारूचा दिवा इतकें सामान लागतें. २. कृति–चाळीस ग्रेन कार्बनेट ऑफ सोडा एका बाटलींत घालून, त्यांत कढत पाणी पाऊण बाटली घालावें. दुसरे बाटलींत तीस ग्रेन चुना घालून, पाऊण बाटली पाणी घालून बाटली हालवावी, पाण्यांत चुना मिसळल्यावर, तें पाणी प्रथम तयार केलेल्या बाटलींतील पाण्यांत मिसळावें व थोडा वेळ कढवून उतरावें व तें पाणी तसेंच निवळत व
पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/५१
Appearance