Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिलें. २३ पाण्यांत पालथी बुडवून हात काढून घ्यावा ह्मणजे बाटलींत पाणी एकदम चढेल. सल्फ्युरेटेड हायड्रोजन. १. सामुग्री-फ्लास्क, नाळकें असलेली नळी, दोन ठिकाणीं काटकोनाकृति वांकविलेल्या कांचेच्या नळ्या दोन, फेरससल्फाईड, (लो- खंडाचा खीस व गंधक एकत्र ऊन केल्याने तयार होणारा पदार्थ ) सल्फ्यूरिक अॅसिड, बुचें दोन, इतकें सामान लागतें. २. कृति – फ्लास्कांत फेरससल्फाईड घालून बूच बसवावें, व फ्लास्काचे बुडास टेंकेल अशी नाळके असलेली नळी बसवावी, व बुचाखालीं येईल, अशी दोहों बाजूंनीं वांकविलेली दुसरी नळी बसवून, त्या नळीचें वांकविलेलें तोंड, एका बाटलींत पाणी घालून त्यास बूच बसवून, बाटलींतील पाण्यांत बरेंच बुडेल असें बसवावें, व दुसरी बांकविलेली नळी पाणी भरलेले बाटलीचे बुचास पाण्यांत नळीचें तोंड न बुडेल अशी बसवावी, व त्या नळीचे दुसरे तोंडास रबराची नळी बसवून फ्लास्कांत सल्फ्यूरिक् अॅसिड घालावें, ह्मणजे सल्फ्यूरेटेड हाय- ड्रोजन निघूं लागेल. हा वायु पाण्यांत फार विरघळणारा असल्यानें तसाच बाटलींत भरावा. ३. ह्याप्रमाणें सल्फ्यूरेटेड हायड्रोजन तयार केला ह्मणजे, फेरस- सल्फाईडचा फेरससल्फेट होतो, व सल्फ्युरिक अॅसिडांतील हायड्रोजन गंधकाशीं संयोग पावून, सल्फ्युरेटेड हायड्रोजन बनून बाहेर येतो. ४. धर्म - सल्फ्यूरेटेड हायड्रोजननें कांहीं धातूंच्या अॅसिड क्षारा- च्या द्रवांत सांका बसतो, व कांहीं धातूंच्या आलकली द्रवांत सांका बसतो, व बाकी धातूंच्या कसल्याही द्रवांत सांका बसत नाहीं. उदाह- रणार्थ, तांब्याचे क्षाराच्या अॅसिड द्रवांत सल्फ्यूरेटेड हायड्रोजननें सांका बसतो, व लोखंडाच्या क्षाराच्या आलकली द्रवांत सल्फ्यरेटेड हायड्रो-