Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुसऱ्या आवृत्तीस प्रस्तावना. 2017 व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ति ग्रंथ- माला नांवाच्या मासिकपुस्तकामधून हप्तेबंदीनें प्रसिद्ध झाली. त्या वेळीं ज्या गोष्टींसंबंधी विशेष विचार करावयास पाहिजे होता त्यांचा पूर्णपणें विचार करण्यास सवड झाली नाहीं. तथापि अशा तऱ्हेचें पुस्तक मराठीमध्यें जरूर पाहिजे असे उद्गार कित्येक सुज्ञ वाचकांच्या तोंडून ऐकल्यावरून हा द्वितीय प्रयत्न केला आहे. त्यामध्ये नवीन माहिती बरीच घातली आहे व विषयाची उपयुक्तता वाढविली आहे. व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र हें कांहीं नवीन शास्त्र नव्हे. ज्याला अरब लोक किमिया ह्मणतात तें व हें शास्त्र एकच. आपल्या देशांत सुद्धां ह्या शास्त्राची प्राचीन कालीं बरीच प्रगति झाली होती; व त्याचा अनेक धंद्यांमध्यें उपयोग करित असत. दोन अथवा अनेक धातू वितळून त्या एकत्र करून कांसें, पितळ, इ० मिश्रधातू तयार करणें, चांदी, सोनें, इत्यादि मौल्यवान् धातूंच्या भांड्यांना, दागिन्यांना डाक लावणें, रंगाचे कपडे तयार करणें, कातडें कमावणें, हीण धातू गाळून शुद्ध धातू तयार करणें, अनेक धातूंचीं भस्में बनवून त्यांचा औषधी कामाकडे उपयोग करणें, इ० अनेक गोष्टींचा व्यावहारिक रसायनशा- स्त्रामध्ये समावेश होतो. सध्यांचा काल धंदेशिक्षणाचा असल्यामुळे सर्व सुधारलेल्या राष्ट्रांमध्ये हें शिक्षण वाढविण्याकडे सतत श्रम चालू आहेत. हिंदुस्थानदेशांत सुद्धां हें शिक्षण वाढविण्याची सरकारची, श्रीमान् व्यापारी लोकांची, व कित्येक राजेरजवाड्यांची खटपट चालू आहे. धंदेशिक्षणाच्या प्रत्येक शाखेचा व रसायनशास्त्राचा अतिशय निकट संबंध असल्यामुळे, सर- कारच्या व प्रजेच्या खटपटीस यश येण्यास रसायनशास्त्राचें शिक्षण