Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ रासायनिक परीक्षण. ठिकाणीं काटकोनाकृति वांकविलेली नळी, बूच, सल्फ्यूरिक अॅसिड, तांब्याचा खीस, रिटॉर्टस्टॅन्ड, दारूचा दिवा इतकें सामान लागतें. - आ० १६. २. कृति - दारूचा दिवा लावतां येईल अशा बेतानें रिटार्ट- स्टॅन्डवर फ्लास्क ठेऊन, त्यांत (आकृति १६ मध्यें दाखविल्याप्रमाणे) तांब्याचा खीस घालावा व बूच बसवून नाळकें असलेली नळी, व, दोन ठिकाणीं काटकोनाकृति वांकविलेली नळी बसवून घेऊन फ्लास्कांत सल्फ्यूरिक् अॅसिड घालावें व दारूच्या दिव्याची उष्णता द्यावी ह्मणजे सल्फ्यूरिक् अॅसिडचें तांब्यावर कार्य होऊन, तांब्याचा सल्फेट (मोरचूद) हो- ईल, व जास्त असलेला गंधक सल्फ्यूरिक अॅ- सिडांतील ऑक्सिजनाशीं संयोग पावून, सल्फर डायऑक्साईड वायु बाहेर निघेल. हा वायु हवेपेक्षां फार जड असल्यानें व पाण्यांत फार विरघळ- णारा असल्यानें, कारबॉनिक अॅसिड वायूप्रमाणेंच बाटलींत धरतां येतो. ३. ह्याप्रमाणे सल्फर डायूऑक्साईड वायु तयार केल्यावर, मागें तांब्याचा सल्फेट व पाणी राहतें. ४. हा वायु एका बाटलींत धरून, त्यांत थोडें नायट्रिक अॅसिड घालावें, ह्मणजे ऑक्साईड ऑफ् नायट्रोजनच्या पिंगट रंगाच्या वाफा निघतील. ह्या वायूनें भरलेल्या बाटलींत पोट्याशियम क्रोमेटचें थोडेंसें पाणी घालावें ह्मणजे त्यास हिरवा रंग येईल. सल्फर डायऑक्साईड ज्वलनास मदत करीत नाहीं. ह्या वायूनें भरलेले बाटलींत पेटलेली मेणबत्ती घातली तर ती विझेल. ह्या वायूची प्रतिक्रिया अॅसिड आहे. लिटमसचें निळें पाणी, ह्या वायूच्या बाटलींत घातले असतां तें तांबडें होईल. हा वायु पाण्यांत फार विरघळतो. हा वायु एका बाटलींत भरावा. नंतर त्या बाटलीचे तोंडावर हात धरून बाटली