प्रकरण पहिलें. सोडीयम आयोडाईड. १. सामुग्री – इव्ह्यापोरेटिंग बेसीन, रिटार्टस्टचॉन्ड, दारूचा दिवा, आयोडीन, कॉस्टिक सोडा इतकें सामान लागतें. १९ २. कृति – इव्ह्यापोरेटिंग बेसिन (वाफ करण्याची वाटी ) मध्ये थोडें सें आयोडीन घालून त्यांत पाणी व कॉस्टिक सोडा थेंब थेंब ह्याप्रमाणें तें सोल्यूशन बहुतेक स्वच्छ (रंगहीन ) होईपर्यंत घालावें. नंतर ती वाटी बाहेरून अगदी कोरडी करून, रिटार्टस्ट्यान्डवर ठेऊन बेतानें आटवून त्यांतील पूड कोरडी करावी. ही पूड सोडीयम आयोडेट नांवाच्या क्षाराची झाली. हीच पेटवावी ह्मणजे सोडीयम आयोडेटचा सोडीयम आयोडाईड बनेल. हा क्षार पांढरा असतो. ३. ह्याप्रमाणे सोडीयम आयोडाईड करतांना शिल्लक राहिलेलें पाणी आटून जळून जातें. ४. धर्म–सोडीयम आयोडाईडच्या द्रवांत (सोल्यूशनांत ) तव- किलाचें पाणी घालावें. सोल्यूशनास नुसते आयोडीनानें निळा रंग येणार नाहीं; पण त्यांत क्लोरिन वायुयुक्त पाण्याचा एक थेंब टाकावा, ह्मणजे आयोडीन वेगळें होईल व सोल्यूशनास निळा रंग येईल; आणि क्लोरीन वायूचें पाणी पुन्हां जास्त घालावें, ह्मणजे आयो- डीनचा क्लोराईड बनेल, व द्रवास आलेला निळा रंग नाहींसा होईल. सोडीयम ब्रोमाईडचे पाण्यांत काडीखाराचें (सिलव्हर नायट्रेटचें) पाणी घालावें, ह्मणजे फिकट पिंवळे रंगाचा न विरघळणारा रुप्याचा आयोडाईडचा सांका बसेल, व मोकळा पडलेला सोडीयम, काडी- खारांतील मोकळे पडलेले नायट्रिक अॅसिडाशीं संयोग पावून, सोडीयम नायट्रेट बनेल व तो पाण्यांत राहील. ब्रोमीन, १. सामुग्री–रिटार्ट, रिटार्टस्टॅन्ड, खादीचें फडकें, अभिषेकपात्र, तिवई, दारूचा दिवा, पोट्याशियम ब्रोमाईड, म्यांगनीज डायआ- क्साईड व सल्फ्यूरिक् अॅसिड इतकें सामान लागतें.
पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/४६
Appearance