Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रासायनिक परीक्षण. पोट्यासियम आयोडाईड, म्यांगनीज डायऑक्साईड, व सलफ्यूरिक् अॅसिड. २. कृति – रिटार्टीत पोट्याशियम आयोडाईड एक ड्राम व थोडा म्यांगनीज डायऑक्साईड, पाणी व डिल्यूट (जलमिश्रित ) सलफ्यूरिकू अॅ- सिड घालून रिटार्ट रिटार्टस्टॅन्डवर ठेवावा. फ्लास्कास ( चंबूस ) खादीचा रुमाल गुंडाळून फ्लास्कांत रिटार्टची नळी घालावी, व दारूचा दिवा लावून रिटार्टखालीं ठेवावा व फ्लास्कास गुंडाळलेल्या रुमालावर पाणी पडेल असें अभिषेकपात्र तिवईवर ठेऊन त्यांत वरचेवर सरेल तसे पाणी घालावें ह्मणजे दिव्याचे उष्णतेनें, रिटॉर्टात अस्मानी रंगाच्या आयोडीनच्या वाफा येतील व त्या फ्लास्कांत थंड होऊन आयोडीन बनेल. ३. ह्याप्रमाणें आयोडीन तयार केलें ह्मणजे रिटॉर्टात पोट्याशि- यम सल्फेट, म्यांगनीज सल्फेट, व पाणी इतके जिन्नस राहतील. ४. धर्म - आयोडीनच्या नीळसर काळ्या रंगाच्या खपल्या अस तात. आयोडीन पाण्यांत फार थोडें विरघळतें, आलकोहोलमध्यें जास्त विरघळतें, व कोणतेही अलकली धातूचे आयोडाईडांत तें फार विरघळतें. तीन ग्लास घेऊन त्यांतील प्रत्येकांत थोडें आयोडीन घालून एकांत पाणी घालावें ह्मणजे पाण्यास पिंवळट रंग येईल. दुसऱ्यांत आलकोहोल घालावा; आलकोहोलांत आयोडीन मिसळून त्यास पिंगट रंग येईल. तिसरे ग्लासांत पोट्याशियम आयोडाईडचें पाणी घालावें, ह्यांत आयोडीन विरघळेल व गडद पिंगट रंगाचें तें पाणी होईल. ओळखण्याची परीक्षा-आयोडीन तवकिलाशीं संयोग पावतें, व त्या- पासून आयोडाईड आफू स्टार्च बनतो. एका टेस्टटयूबमध्ये पाणी घालून त्यांत थोडें तवकील टाकावें; व नळी बाहेरून कोरडी करून दारूचे दिव्यावर ऊन करून तवकिलाचें पाणी तयार करावें; नंतर त्यांत आयोडीन घालावें, ह्मणजे पाण्यास गडद निळा रंग येईल. ह्याच पाण्यास ऊन करावें ह्मणजे रंग नाहींसा होईल; पण तेंच थंड झालें ह्मणजे पुन्हा रंग येईल.