Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. रासायनिक परीक्षण. हायड्रोक्लोरिक अॅसिडाच्या वाफा निघून त्या कांचेच्या नळीवरील आमोनियाशीं संयोग पावून त्याचा नवसागर बनेल, व तो नळीवर जमून राहील. ५. हायड्रोक्लोरिक अॅसिड मिठांत असतें. क्यालसियम हायपोक्लोराइट. ( ब्लीचिंग पावडर अथवा रंगनाशक पूड. ) - १. तयार करण्यास लागणारी सामुग्री – क्लोरिन तयार करण्याचें सामान, कांचेचें पंचपात्र व चुन्याचें पीठ इतकें सामान लागतें. २. कृति-कांचेच्या पंचपात्रांत पाणी घालून त्यांत पांढरा रंग येईल इतकें चुन्याचें पीठ घालून, नंतर त्या पाण्यांत उग्र वास येऊं लागेपर्यंत क्लोरिन वायु सोडावा, ह्मणजे त्यांत क्यालसियम हायपो- क्लोराइट तयार होऊन राहील. ३. धर्म – ह्याप्रमाणें क्यालसियम हायपोक्लोराइट तयार केला ह्मणजे मागें कांहीं रहात नाहीं. ब्लीचिंग सोल्यूशन ( रंगनाशक द्रव) तयार झाल्यावर त्यांत तांबड्या अलवानाचा तुकडा व पाणी मिसळलेलें हायड्रोक्लोरिक अॅसिड टाकावें, ह्मणजे क्लोरिन वायु वेगळा पडेल व अलवानाचा तुकडा पांढरा होईल. हायपोक्लोरस ॲसिड. - १. तयार करण्यास लागणारी सामुग्री - रिटॉर्ट, रिटॉर्टस्ट्यांड, फ्लास्क, खादीचा रुमाल, अभिषेकपात्र तिवईसह, क्यालसियम हायपोक्लोराइटचें सोल्यूशन (ब्लीचिंग सोल्यूशन), डिल्यूट (जलमिश्रित ) नायट्रिक अॅसिड व दारूचा दिवा इतकें सामान लागतें.