Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ रासायनिक परीक्षण. ३. ह्याप्रमाणे कार्बानिक अॅसिड ग्यास तयार करूं लागले ह्मणजे, खडूंतील क्यालसियम धातू हायड्रोक्लोरिक अॅसिडाशीं संयोग पावून, त्याचा क्यालसियम क्लोराईड बनतो, व खडूंतील कार्बनिक अॅसिड ग्यास बाहेर पडतो. आ० ११. ४. धर्म–कार्बनिक अॅसिड वायु ज्वलनास मुळींच मदत करीत नाहीं. कार्बनिक अॅसिड वायूनें भरलेल्या बाटलींत पेटलेली मेणबत्ती घातली तर ती विझेल. कार्बानिक अॅसिड वायूनें भरलेल्या बाटलींत चुन्याची निवळी घालावी ह्मणजे ती दुधासारखी पांढरी होईल, व कांहीं वेळानें क्यालसियमचे कार्बनेटचा पांढरा सांका खालीं बसेल. कार्बानिक अॅसिड वायु हवेपेक्षां जड आहे. एका रिकामे (साध्या हवेने भरलेल्या) बाटलीवर कार्बानिक अॅसिड वायु भरलेली बाटली पालथी ठेविली तर, खालील बाटलींतील हवा हलकी असल्यानें वरचे बाटलींत जाईल, व वरील बाटलींतील कार्बानिक अॅसिड वायु जड असल्यानें खा- लच्या बाटलींत येईल; पेटलेली मेणबत्ती खालचे बाटलींत घातली तर ती विझते, यावरून हें समजेल. (आकृति ११ पहा.) कार्बानिक अॅसिड ग्यास खडूंत व संगमर- वरी दगडांत, शिंपल्यांत इ० पदार्थीत असतो. ● कोरिन वायु. - १. तयार करण्यास लागणारी सामुग्री – फ्लास्क ( उंच गळ्याचा चंबू ), वांकडी नळी, मीठ, म्यांगनीजू डाय् ऑक्सा- ईड, सलफ्यूरिक ऑसिड, दारूचा दिवा, इतके जिन्नस लागतात.