१० रासायनिक परीक्षण. ऑफू आमोनियांतील हायड्रोजन, त्यांतील कांहीं ऑक्सिजनाशी संयोग पावून पाणी बनतें, व बाकी राहिलेला ऑक्सिजन नायट्रोजनाशीं संयोग पावून नायट्रस ऑक्साईड बाहेर येतो. — ४. धर्म - ह्या वायूला कसलाही रंग नाहीं. हा वायु पारदर्शक आहे. याला वास मधुर येतो. हा वायु ऑक्सिजनाप्रमाणे ज्वलनास मदत करतो. ह्या वायूनें भरलेले बाटलींत कोलती घातली तर ती भक्क करून पेटेल. एक टेस्टटयूब ह्या वायूनें अर्धी भरावी, तीवर बोट ठेऊन नळी जोरानें हलवावी, व नळी पाण्यांत बुडवून बोट काढावें, ह्मणजे नळींतील पाण्यांत नायट्रस ऑक्साईड विरघळल्यानें नळींत जास्त पाणी चढेल. हा वायु पाण्यांत जितका विरघळतो तितका ऑक्सिजन विरघळत नाहीं. ह्यावरून, नायट्रस ऑक्साईड व ऑक्सिजन एकमेकां- पासून ओळखतां येतात. हा वायु हवेंत मिसळून तें मिश्रण आपण हुं- गलें तर आपल्यावर एक प्रकारचा मादक परिणाम होतो. ह्मणून ह्यास 'हंसविणारा वायु' ह्मणतात. रोग्यास क्षणभर बेशुद्ध करण्यासाठीं शस्त्रक्रियेत ह्याचा उपयोग करतात. हा वायू रक्तांत शिरला तर तेथील आक्सिजनला हाकून लावतो. तेणेंकरून प्राणी गुदमरून मरतो. नायट्रिक ऑक्साईड. १. तयार करण्यास लागणारी सामुग्री - हायड्रोजन तयार करणेची बाटली, तांब्याचा चुरा, नायट्रिक अॅसिड, पाण्याचें पातेलें, ह्याप्रमाणें सामान लागतें. 6 २. कृति – हायड्रोजन काढण्याचे बाटलींत (आ० ५ पहा ) तांब्याचा चुरा घालून नायट्रिक अॅसिड घालावें, ह्मणजे नायट्रिक अॅसि- डाचें कार्य तांब्यावर होऊन, नायट्रिक ऑक्साईड निघेल; पण बाटलींत असलेल्या हवेंतील ऑक्सिजनाशीं तो संयोग पावून, पर ऑक्साईड ऑफू नायट्रोजन' बनतो, व त्याच्या तांबड्या वाफांनी बाटली भरेल. बाटली तांबड्या वाफांनी भरली ह्मणजे, मग शुद्ध नायट्रिक ऑक्साईड येऊं लागेल, व पाण्यानें भरलेल्या बाटल्या, पाण्याचे पातेल्यांत पालथ्या धरून त्यांत तो धरावा.
पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/३७
Appearance