प्रकरण पहिलें. वाफ थंड होऊन तिचें पाणी होईल, व तें बाटलींत सांठेल. हेंच नायट्रिक अॅसिड होय. ३. ह्याप्रमाणें नायट्रिक अॅसिड तयार करूं लागले ह्मणजे, अॅसि- डाचें सोरमिठावर कार्य होऊन, अॅसिडांतील निम्मा हायड्रोजन वेगळा पडून, तितकी सोरमिठांतील पोट्याशियम धातु ॲसिडांशीं संयोग पावून, हायड्रिक पोट्याशियम सल्फेट नांवाचा क्षार बनतो, व तो रिटार्टीत तसाच राहतो, व वेगळा पडलेला हायड्रोजन सोरमिठांतील नायट्रिक ऑक्साइडार्शी संयोग पावून नायट्रिक अॅसिड बनतें. ४. एका टेस्टट्यूबमध्यें निळाचें पाणी तयार करून त्यांत नायट्रिक अॅसिड घालावें, ह्मणजे निळा रंग नाहींसा होऊन तांबड्या रंगाचें पाणी तयार होईल. नायट्रिक अॅसिड कसे ओळखावें- एका टेस्टट्यूबमध्यें तांब्याचा खीस घालून त्यांत पाणी घालावें व नंतर त्यांत नायट्रिक अॅसिड घातलें ह्मणजे तांबें विरघळू लागेल. तांब्याचें निळ्या रंगाचें नायट्रेटचें पाणी होईल, व ऑक्साइड ऑफ् नायट्रोजनच्या तांबड्या वाफा निघतील. अशा स्थितींत असलेलें नायट्रिक अॅसिड, एखाद्या पदार्थाचा संयोग ऑक्सिजनबरोबर पाववितें. एका टेस्टट्यूबमध्यें पाणी घालून त्यांत नायट्रिक अॅसिड घालावें व मग त्यांत सल्फ्यूरिक् अॅसिड थोर्डे घालून, तें मिसळेपर्यंत टेस्टट्यूब हालवावी. मिसळल्या- नंतर टेस्टट्यूबमधील पाणी थंड होईपर्यंत टेस्टट्यूब तशीच ठेवावी. चांगलें थंड झाल्यावर, त्यांत हिराकसाचें पाणी तयार करून तें हळूच टेस्टट्यूबचे कडेनेंच घालावें, ह्मणजे टेस्टट्यूबमधील ॲसिडाचे द्रवा- पेक्षां हिराकसाचें पाणी हलकें असल्यानें, टेस्टट्यूबमधील अॅसिडाच्या द्रवाचे व नवीन घातलेल्या हिराकसाचे पाण्याचे दरम्यान काळी कडी दिसेल. ५. नायट्रिक अॅसिड सोरमिठांतून काढतात. -
पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/३४
Appearance