Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रासायनिक परीक्षण. ह्मणजे फॉस्फरस विझेल व हंडींतील जितका ऑक्सिजन फॉस्फरसाशीं संयोग पावला, तितकें पाणी वर चढेल. दोन भाग फॉस्फरस, पांच भाग ऑक्सिजनशीं संयोग पावतो. ऑक्सिजन व फॉस्फरसचा सं- योग होऊन झालेला पांढरा धूर, पाण्यांत विरघळून जाईपर्यंत थांबावें, ह्मणजे हंडींत नायट्रोजन शिल्लक राहील. ४. धर्म - नायट्रोजन ज्वलनास मदत करीत नाहीं व स्वतःही पेटत नाहीं. नायट्रोजन भरलेल्या बाटलींत पेटलेली मेणबत्ती घालावी, ह्मणजे मेणबत्ती विझेल व नायट्रोजनही पेटणार नाहीं. ५. नायट्रोजन हवेंत मिसळलेला असतो. नायट्रिक अॅसिड, १. तयार करण्याची सामुग्री-रिटार्टस्टांड, रिटार्ट, एक बाटली, दारूचा दिवा, सोरमीठ, सल्फ्यूरिक् अॅसिड, मातीचा कुंडाला, अभिषेकपात्र इतके जिन्नस लागतात. - २. कृति – रिटार्टीत चार तोळे सोरमीठ व चार तोळे सल्फ्यू- रिक अॅसिड घालावें. रिटार्टस्ट्यांड- आ० ८. वर ठेऊन त्याची नळी एका दुसऱ्या बाटलींत घालावी, व दारूचा दिवा पेट- वावा. मग रिटार्ट बाहेरून कोरड्या फडक्यानें पुसून दारूचा दिवा रिटार्टाचे खालीं ठेवून, रिटार्टाचे सर्व बाजूस ज्योत लागेल असा तो दिवा फिरवीत असावें. ह्याप्रमाणें मिनिट अर्धे मिनिट दिवा फिरवून मग रिटार्टाचे मधोमध ज्योत लागेल असा दिवा ठेवून द्यावा, ह्मणजे रिटार्टीतील पदार्थ कढून तांबड्या वाफा येऊं लागतील, व त्या रिटार्टाचे नळींतून बाटलींत येतील. त्या वाफा थंड करण्यास बाटलीवर अभिषेकपात्रानें पाण्याची धार धरावी (हें वरील आकृतीमध्ये दाखविलेलें नाहीं. ) ह्मणजे REA