प्रकरण पहिलें. ड्रोजन बाहेर सोडून देतें व जस्त घेतें. ह्या योगानें बाटलींत जस्ताचा सल्फेट होऊन मागें राहतो. ४. धर्म – हायड्रोजन, ऑक्सिजनसारखा ज्वलनास मदत मुळींच आ० ७. करीत नाहीं. पेटलेली मेणबत्ती हायड्रोजननें भरलेल्या बाटलींत घातली तर ती विझते; (आकृति ७ पहा.) पण ज्या ठिकाणी हवेंतील ऑक्सिजन हायड्रोजनास मि- ळेल, त्या ठिकाणीं हायड्रोजन स्वतः पेट घेईल, व ती विझलेली मेणबत्ती हायड्रोजन पेटलेल्या ठिकाणीं आ- णिली तर, अर्थातच पेटेल. आकृति पांचमध्यें हैड्रोजन कसा जळतो हें दाखविलें आहे. हायड्रोजन वायु हवे- पेक्षां फार हलका आहे. त्यास रंग नाहीं. दोन भाग हायड्रोजन व एक भाग आक्सिजन असे एका बाटलींत घालून पेटविले तर, बंदुकी- सारखा मोठा आवाज होतो व त्याचें पाणी होतें. ५ ५. हायड्रोजन पाण्यांत सांपडतो. पाण्यापासून हैड्रोजन तयार करण्याची कृति आ० ६ मध्ये दाखविली आहे. नायट्रोजन. १. तयार करण्यास लागणारी सामुग्री- फॉस्फरस, पातेलें, लहानशी हंडी व एक कौलाचा तुकडा इतकें सामान लागतें. - - कृति – पातेल्यांत पाणी घालावें. मग पाण्याच्या वर येईल असा एक दगड पातेल्यांत ठेवून, त्यावर कौलाचा तुकडा ठेवून त्या वर फॉस्फरसाचा तुकडा ठेवावा व तो पेटवावा. फॉस्फरस पेटतांच त्यावर हंडी पालथी घालावी, ह्मणजे दोन तीन तासांनीं हंडींत नायट्रो- जन तयार होईल. (आकृति ४ पहा.) ३. ह्याप्रमाणें नायट्रोजन तयार करूं लागलें ह्मणजे, हंडींतील हवा ऊन झाल्याने कांहीं बाहेर जाईल व हंडींतील राहिलेल्या हवेंतील ऑक्सिजन फॉस्फरसाशीं संयोग पावेल; व त्यांतील ऑक्सिजन संपला
पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/३२
Appearance