Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रासायनिक परीक्षण. घालावें; नंतर त्यांत सल्फ्यूरिक अॅसिड थोडें थोडें घालावें, ह्मणजे हायड्रोजन निघूं लागेल; पण तो लागलाच उपयोगांत आणूं नये. कारण, बाटलींतील हवा त्यांत मिसळलेली असते; ह्मणून कांहीं वेळ तो तसाच जाऊं द्यावा. नंतर टेस्टट्यूब पालथी धरून त्यांत रब- राची नळी अगदीं वरपर्यंत घालून, ती अगदी हळू हळू काढून घ्यावी, व टेस्टट्यूब दिव्यावर घरावी. 'कुंई' असा आवाज होईल तर, हायड्रोजन शुद्ध आहे असे समजावें. व 'फट् ' असा आवाज होऊन हायड्रोजन पेटेल तर, तो शुद्ध आहे असे समजावें व तो उप- योगांत आणावा. तापवून लाल केलेल्या लोखंडावरून पाण्याची वाफ व आ० ६. जाऊं दिली असतां, वार्फेतील आक्सिजन लोखंडाशीं संयोग पावून, हैड्रोजन वेगळा निघतो. आकृति ६ मध्यें, एका चंबूत पाणी कढत ठेवून, त्याची वाफ एका पेटलेल्या भट्टींत लोखंडाच्या नळींतून बाहेर सोड- लेली आहे. ह्या नळींत लोखंडाचा खीस भरलेला आहे. तो तापून लाल झाल्यामुळे, त्याच्यावरून जाणाऱ्या वार्फेतील आक्सिजन त्याच्याशीं संयोग पावतो, व नळीच्या दुसन्या तोंडांतून हैड्रोजन बाहेर पडतो. तो एका कांचेच्या नळींत धरून दाखविला आहे. ३. बर सांगितल्याप्रमाणें हायड्रोजन काढूं लागलें ह्मणजे, सल्- फ्यूरिक अॅसिड जस्ताशीं संयोग पावून, आपल्या जवळ असलेला हाय-