Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीगणराज. प्रस्तावना. उद्योग दोन प्रकारचे; एक द्रव्यप्राप्तीसाठीं व दुसरा करमणुकीसाठीं. ह्यांतील द्रव्यप्राप्तीसाठीं जो उद्योग करणें तो अनेक जातींचा करावा लागतो; नाहींतर द्रव्य मिळणार नाहीं. हा प्रकार करमणुकीच्या उद्योगांत दिसत नाहीं. त्यांत वेडेचारही असू शकतात. त्यापासून एखादे वेळीं मनुष्य संगतीस नालायक होण्याचा संभव असतो. वेडेचाराचे उद्योगास निरुद्योग हेंही नांव दिलें असतां चालेल; कारण, मनुष्य निरुद्योगी असला ह्मणजे त्यास वेडेचार आठवूं लागतात. करमणुकीच्या उद्योगास चांगली दिशा लागल्यास, त्या मनुष्यास थोर्डेबहुत ज्ञान मिळतें व चांगली संगतीही मिळते. ह्या योगानें तो जगांत पुढें येतो. त्याप्रमाणे मला रसायनशास्त्राचे प्रयोग पाहण्याचा व सोपे प्रयोग हातानें करण्याचा प्रोफेसर बाळाजी प्रभाकर मोडक कोल्हापूर राजारामकॉ- लेजांतील रसायनशास्त्राचे अध्यापक ह्यांनीं नाद लावला; व त्याबद्दल त्यांचे हातून होईल तितकें उत्तेजन मिळालें, ह्या योगानें मला जे जगांत पुढें येण्यास सांपडलें व सांपडेल त्या सर्वाचें श्रेय त्यांस आहे. आतां आमचे गुरुजी प्रोफेसर मोडक यांनी मला जें शिकविलें व जो नाद लाविला, तो मीं कितपत चालविला आहे, हे त्यांस ठाऊक आहेच, व मीं कांहीं केलें आहे किंवा नाहीं हें पाहण्यास प्रॅक्टिकल केमिस्ट्रीचें भाषांतर करण्याचा प्रयत्न केला व जें कांहीं थोडें बहुत केलें होतें, तें गुरुवर्य प्रोफेसर मोडक यांस दाखविले. त्यांनी उत्तेजन व धीर दिल्यानें, हें छापून काढावें असा विचार केला. त्याच समयीं प्रोफेसर विष्णु गोविंद विजापूरकर एम्. ए., यांनीं हें भाषांतर ग्रंथमाला मासिक पुस्तकांत छापण्याचें आश्वासन दिल्यानें, मला