Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रासायनिक परीक्षण व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र. प्रकरण पहिलें. ____ अथवा ऑक्सिजन. १. तयार करण्यास लागणारी सामुग्री-ऑक्सिजन तयार करण्यास, तांब्याचा रिटॉर्ट, रबराची नळी, शेगडी, पाण्याचें पातेलें, पोट्याशियम क्लोरेट, आणि मँगनीज डायऑक्साईड, इतकें सामान लागतें. २. ऑ० तयार करण्याचा प्रयोग - रिटॉर्टमध्यें पोट्या- - आ० १. शियम क्लोरेट चार तोळे व मँगनीज डायऑक्साईड एक तोळा असें घालावें. रिटॉर्टचे नळीस रब- राची नळी जोडून, रिटॉर्टचें तोंड उ- डदाचें पीठ पाण्यांत कालवून त्यानें गच्च बंद करावें, व रिटॉर्ट शेगडींतील निखाऱ्यावर अथवा बुन्सनच्या दिव्यावर ठेवावा, ह्मणजे कांहीं वेळानें ऑक्सिजन सपाट्यानें निघूं लागेल; तो धरण्याकरितां बाटल्या पाण्याने भरून त्यांत हवा न जाऊं देतां, पाण्याचे पातेल्यांत पालथ्या धरून बाटलीचे तोंडाशीं रबराची नळी धरावी ह्मणजे ऑक्सिजन बाटलींत जाईल, व बाटलींतील पाणी बाहेर पातेल्यांत येईल. ऑक्सिजन निघूं लागला ह्मणजे तो सपाट्यानें निघूं लागतो. सबब, तो धरण्यास