१० रासायनिक परीक्षण. - टेस्टटयूबब्रश – परीक्षणाचे काम संपल्यावर टेस्टटयूब साफ धुतली पाहिजे. ती हातानें अगर पाण्यानें खळ- बळून साफ निघत नाहीं, ह्मणून एका कुंचल्यानें धुतात. त्यास टेस्टटयूत्रब्रश ह्मणतात. आ० ४. आ० ४. आ० ५. स्पिरिट लॅम्प - परीक्षणक्रियेस अनेक प्रसंगीं उष्णतेची जरूर असल्यामुळें, स्पिरिट ( जाळण्याची दारू ) च्या दि- व्याचा उपयोग करितात. ह्या दिव्याची उष्णता इतर तेलाच्या दिव्यांपेक्षां अधिक असते, व त्यांच्याप्रमाणें ह्याला काजळी येत नाहीं, ह्मणून रासायनिक परीक्षणाचे काम ह्याचा वारंवार उपयोग करतात. आ० ५ पहा. दिवा लावतेवेळीं दिव्याचें टोपण काढावें. दिव्याचें काम झाले ह्मणजे टोपण घालावें, ह्मणजे दिवा विझतो. टोपण घालण्यास कधींही विसरूं नये. कारण, स्पिरिट हा पदार्थ उडून जाणारा असल्यामुळे उघड्या दिव्यांतून तो लवकर नाहींसा होतो. खापराचा नळा- दिव्याची ज्योत वान्यानें हलूं नये, ह्मणून दिव्याच्या भोंवतीं एक खापराचा नळा ठेवतात. ह्या नळ्याच्या बाजूस भोंके असतात, त्यांतून दिव्यास हवेचा पुरवठा होतो. लोखंडी तारेची जाळी- ही जाळी खापराच्या नळ्यावर आडवी ठेवून, त्यावर दुसरें भांडे ठेवून त्यांतील पातळ पदार्थ आट- वितां येतात. ह्या जाळीमध्ये मोठे हितावह असे दोन धर्म आहेत. ज्या ठिकाण दिव्याची ज्योत लागते तेथेंच फक्त ती तापते. बाकीची जागा थंड असते, ह्मणून तिचे कोंपरे धरून ती उचलतां येते. शिवाय
पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/२१
Appearance