Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्धात. टेस्टटयूब आणि टेस्टटयूबहोल्डर – आ० २. परीक्षेकरितां आपणाकडे आलेल्या पदार्थांचा द्रव करून तो टेस्टग्लासमध्ये ठेवल्यानंतर, त्याचें अनेक रीतीनें परिक्षण करतां यावें ह्मणून, त्यांतील थोडासा द्रव ज्या नळीमध्यें घे- तात, त्यास टेस्टटयूब ह्मणतात. तिचा आ- कार आकृति २ (अ) मध्यें दर्शविला आहे. ह्या नळ्या लहान मोठ्या पुष्कळ प्रकारच्या असतात. परीक्षेचें काम चालू असतां, पुष्कळ वेळीं टेस्टटयूब दिव्यावर धरून ऊन करावी लागते. ती तापली असतां हात भाजेल ह्मणून, किंवा त्यांतील द्रवास कढ येऊन तो टेस्टटयूबमधून बाहेर पडून हातावर सांडेल ह्मणून, टेस्टटयूब धरण्याचा एक प्रकारचा चिमटा असतो, त्यास टेस्टटयूबहो- ल्डर ( ब ) ह्मणतात. ह्यामध्यें टेस्टटयूब कशी धरावी हें आकृति २ मध्ये दाखविलें आहे. आ० २. p अ टेस्टटयूबस्टँड–आ० ३. टेस्टटयूबमध्यें परीक्षणद्रव्य घालून आ० ३. त्याची परीक्षा झाल्यानंतर, त्यांतील द्रव एकदम टाकूं नये किंवा ती धुवूं नये. परीक्षण कर- ण्याचे जे अनेक मार्ग आहेत, त्यांच्या परिणा- मांची परस्पर तुलना करण्यासाठीं, सर्व टेस्टट्यूब जशाच्या तशा ठेवाव्या लागतात. टेस्टट्यूबचें बूड वाटोळें व निमुळतें असल्यामुळे, ती जमिनीवर उभी राहू शकत नाहीं, ह्मणून ती ठेवण्यास आ० ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे लांकडाचा घोडा केलेला असतो. ह्यास 'टेस्टटयूबस्टँड' ह्मणतात. 1000000000