Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्पणपत्रिका. गुरुवर्य - प्रोफेसर बाळाजी प्रभाकर मोडक यांचे सेवेसीं, आपल्या आनंदी व उत्तेजक स्वभावावर व आपल्या अनुभवजन्य ज्ञानावर माझी पूर्ण श्रद्धा बसून दिवसेंदिवस मला जें कांहीं ज्ञान प्राप्त झालें तें ज्ञान मिळवितांना मला कितीही आयास पडले व अडचणी आल्या तरी त्यांकडे लक्ष न देतां आपल्या उपदेशास अनुसरून वागलों. त्या आपल्या श्रमाचें हें पुस्तकरूपी लहानसे फल आपण स्वीकाराल अशी फार उमेद आहे. आपण वारंवार दाखवित आलेल्या अव्याहत प्रेमानें व स्वार्थपराङ्मुखतेनें माझें किती हित झालें ह्याची कल्पना मजपेक्षां इतरांस क्वचितच करतां येईल. त्या सर्व हिताची अंशतः तरी ह्या भेटीनें योग्य फेड होण्यासारखी असल्यास मी स्वतःला फार धन्य मानीन. मिरज प्रयोगशाळा. तारिख १ आगस्ट १९०९. आपला आज्ञांकित विद्यार्थी, गं० ग० पटवर्धन.