रासायनिक परीक्षण लागते. असे केल्यानंतर हात धुवून, कोरडा करण्यास कधींही विसरूं नये. कारण दुसरें परीक्षण करितांना भलताच परिणाम दिसून दिशा- भूल होण्याचा संभव असतो. अथवा टेस्टट्यूबमधील द्रव्य विषारी असल्यास चुकून तोंडांत हात जाण्याचा संभव असतो. २१. परीक्षक द्रवाच्या बाटल्या कधींही उघड्या टाकूं नयेत, व त्यांचें काम होतांच त्या जेथल्या तेथें ठेवाव्यात. परीक्षण करण्याचे टेबलावर विनाकारण जिनसांची गर्दी करूं नये. २२. एका परीक्षणासाठीं सिरिटचा दिवा पेटविला असतां, तो तसाच पेटत ठेवण्याची पुष्कळांना संवय असते. ही संवय वाईट. कारण स्पिरिट विनाकारण जळून जाते. २३. परीक्षणाच्या टेबलावर पाण्याची नळी घेतली असल्यास, ती उगीच वाहूं देऊं नये. तिच्या आवाजानें मन द्विधा होतें, व पाणी फुकट जातें तें वेगळेंच. . २४. परीक्षणाचे काम करतेवेळीं इकडे तिकडे ओले हात झाडूं नयेत, अगर भलत्याच ठिकाणीं पुसूं नयेत. कारण त्यापासून घाणेरडे डाग चोहोंकडे पडतात. स्वतःचे कपड्यावर डाग न पडावेत ह्मणून, एक सरपोस गळ्यापासून पायांपर्यंत बांधावा. २५. एकंदरींत रासायनिक परीक्षण करणारानें जितकें स्वच्छ, व्यव- स्थित, नियमित, टापटिपीनें रहावें तेवढे थोडेंच. पृथक्करणास लागणारीं उपकरणीं व द्रव्यें. टेस्टग्लास – आकृति १. ज्या पदार्थाची परीक्षा करावयाची आ० १. असेल, तो पदार्थ पाण्यांत अगर अॅसिडांत वगैरे विरघळून त्याचा द्रव करावा, व तो द्रव ह्या पेल्यांत घालून ठेवावा, व परीक्षा करतांना जसा जसा तो लागेल, तसा तसा ह्या पेल्यांतून टेस्टटचूत्रमध्यें ध्यावा.
पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/१९
Appearance