उपोद्धात. १३. परीक्षेचे वेळीं उजव्या हातांत बाटली घेऊन डाव्या हाताचा आंगठा व पहिलें बोट यांच्यामध्यें टेस्टटयूब धरून, बाकीचीं बोटें हातांत धरलेल्या नळीच्या आड न येतील अशीं बाजूस करावीत. १४. परीक्षक पदार्थ तपासण्याच्या पदार्थात एकदम भस्स करून ओतूं नये, थेंब थेंब टाकावा. कारण पुढें अर्से दिसून येईल कीं, एका परीक्षकानें पडलेला सांका, तोच परीक्षक अधिक घातल्यानें विरघळून जातो, किंवा परीक्षक जों जों अधिक अधिक घालावा, तों तों सांक्याचा रंग बदलत जातो. १५. परीक्षक पदार्थाच्या प्रत्येक बाटलीवर लेवल ( नांवाची चिठी ) असावें, व बाटलींतील पदार्थ ओततेवेळीं, लेबल आपल्या हाताखाली झांकले जाईल असें धरावें, ह्मणजे त्यावर ओघळ जाणार नाहींत. १६. टेस्टट्यूब ऊन करतेवेळी त्यांत कढणारा पदार्थ स्वतःच्या किंवा शेजारच्या मनुष्याच्या अंगावर न उडेल अशा रीतीनें ट्यूब धरली पाहिजे. १७. टेस्टट्यूत्र दिव्याच्या ज्योतीवर धरण्यापूर्वी, तिचें बाहेरचें अंग फडक्यानें पुसून कोरडें केलें पाहिजे. नाहींतर ती चटकन् फुटते. १८. ताजवा, सुरी वगैरे जिन्नस एक वेळ उपयोगांत आणिले असतां, पुनः उपयोगांत आणतेवेळीं ते स्वच्छ धुवून कोरडे करून आणले पाहिजेत. १९. ताजव्याची एक बाजू नेहमीं वजने टाकण्यासाठीं कायम ठेवावी. वजनांस अॅसिडांचा स्पर्श होऊं देऊं नये व तीं जोरानें घासूं नयेत. कारण ह्या दोन्हीं कारणांनीं तीं झिजून जाऊन दिवसेंदिवस कमी कमी वजन भरतात. त्याचप्रमाणे वजनांवर कीट वाढू देऊं नये. नाहींतर कीटांचें वजन खन्या वजनांच्या भरीस पडतें. २०. परीक्षण द्रवांत परीक्षक द्रव घातल्यानंतर टेस्टट्यूबच्या तोंडा- वर हाताचा आंगठा ठेवून, टेस्टट्यूब अनेक प्रसंगी सपाटून हलवावी
पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/१८
Appearance