उपोद्धात. कोणत्या असिडाशीं त्यांचा संयोग झाला आहे. एवढ्यासाठीं धातू आणि असिडें ह्यांचे अनेक वर्ग केले आहेत. एकाच परीक्षकानें ज्या धातूंचा सांका बसेल किंवा ज्या असिडावर कार्य होऊन त्याचें स्वरूप बदलेल, त्या सर्व धातू व तीं असिडें एका वर्गात घालावयाचीं. येणेंप्रमाणे एकंदर धातूंचे पांच वर्ग व असिडाचे चार वर्ग केलेले असून, प्रत्येक वर्गास त्यांतील एकाद्या प्रसिद्ध धातूचें अथवा अ- सिडाचें नांव दिले आहे. ज्या परीक्षकाच्या योगानें अमुक धातू अथवा असिड कोणत्या वर्गीतील आहे हें ओळखतां येतें, त्यास वर्गपरीक्षक ह्मणावें. एकाच वर्गीतील कित्येक व्यक्तींवर दुसऱ्या प्रत्येक परीक्षकाचीं विशिष्ट कार्ये होतात, तशीं बाकीच्यावर होत नसल्यामुळें, त्या वर्गाचे पोटवर्ग केलेले आहेत. नंतर प्रत्येक व्यक्तीवर निरनिराळ्या परीक्षकांची कार्ये एकसारखीं होत नसल्यामुळे, व्यक्तिपरीक्षकांचा उप- योग करून ती ओळखण्याची तजवीज केलेली असते. व आपण केलेले निदान बरोबर आहे किंवा नाहीं है पाहण्यासाठीं ताळा पाह- ण्याची एक परीक्षा असते, ती करावी लागते. इतकें सर्व झालें ह्मणजे पृथक्करण पूर्ण झालें ह्मणावें. पृथक्करण करणारास प्रथमारंभींच्या सूचना. १. पृथक्करण करितांना प्रत्येक वेळीं टेस्टट्यूब स्वच्छ धुवून घ्यावी; नाहींतर परीक्षणद्रवांत नसलेल्या कित्येक पदार्थाचा भास होईल व परीक्षा करणारास उगीच दिशाभूलही होईल. २. परीक्षक द्रव, ज्यास इंग्रजींत रीएजंट्स ह्मणतात, ते वाफेच्या पाण्यांत करावेत व एक औंस द्रव्यास वीस औंस पाणी याप्रमा- णानें करावेत. ३. बाटल्या प्रथम अगदीं खच्छ धुवाव्या, आणि नंतर वाफेचें पाणी घालून विसळून मग त्यांत परीक्षक द्रव करावेत. ४. चुन्याची निवळी एक दिवसाआड नवीन घ्यावी.
पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/१६
Appearance