Jump to content

पान:रासायनिक परीक्षण अथवा व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रासायनिक परीक्षण व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र. अथवा उपोद्धात. पदार्थाचे भेद — आपण आपल्या भोंवतीं क्षणभर जर दृष्टि फेंकली, तर जे जे पदार्थ आपणास दिसतात, ते सर्व मुख्य तीन वर्गीपैकी कोठल्या तरी एका वर्गाचे आहेत असे आपणास कळून येतें. ते तीन वर्ग ह्मणजे खनिज, उद्भिज्ज व प्राणिज हे होत. को- णताही पदार्थ आपण घ्या, तो ह्या तीन वर्गीपैकी कोणत्या तरी एकांत असलाच पाहिजे. - उत्पत्ति - प्रत्येक पदार्थ पाहून आपणास तो जसा दिसतो तसाच तो आपोआप तयार झाला आहे काय, असा प्रश्न सहज प्रत्येक विचारी व चौकस मनुष्याच्या मनांत येतो. ह्या प्रश्नाचें उत्तर एकाएकी देणें फार कठिण आहे. क्षणभर विचार केल्यावर, 'नाहीं' असेंच उत्तर द्यावें लागतें. ह्याचें कारण असे आहे प्रत्येक पदार्थाची रचना व अंतर्बाह्य स्वरूप हीं अनेक प्रेरणांच्या सहकारित्वाचें फल होय. प्रेरणा – ह्मणजे काय ? अगदी साधें आपण एक उदाहरण घेऊं; ह्मणजे आपल्या शंकेचें निवारण होईल. आपण एक मेणबत्ती घेऊं, आणि सृष्टींत ती अशीच असते किंवा भिन्न भिन्न स्वरूपांत ती वेगळ्या वेगळ्या ठिकाणीं आढळते, ह्याचा आपल्याशींच आपण विचार करूं. आपणास असे दिसून येतें कीं, ज्या चर्बीपासून मेणबत्ती तयार होते ती स्परम्यासिटी चर्बी जर हवेच्या नेहमींच्या उष्णतेनें वितळून पातळ झाली असती, तर आपणांस मेणबत्ती बाळगणे हल्लीं इतकें सुलभ व सोयीचें