पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कराचीला जीनांकडे गेले तेव्हा जीनांनी त्यावर नजर टाकून तसाच तो कागद सु-हावर्दीखलिकुत्झमान यांच्याकडे परत केला. (पहा - 'Pathway to Pakistan' by Choudhary Khalikutzaman, pp.410) जीनांना खरोखर फाळणीनंतर हिंदू-मुस्लिम संबंधांना आणि भारत-पाक संबंधाना इष्ट वळण लावावयाची इच्छा होती हे त्यांच्या या कृतीत अभावानेच दिसून येते.

 या प्रकरणाच्या आरंभीच जीनांच्या पत्रकार परिषदेतील मुलाखतीचा उल्लेख आला आहे. “अल्पसंख्यांकाना मी सत्तेवर असेपर्यंत काळजीचे कारण नाही" असे सांगताना 'I mean what I said and what I said I mean' अशी त्यांनी पुस्ती जोडली होती. आत्तापर्यंत सांगितलेल्या घटनांवरून त्यांनी आपले शब्द किती खरे केले हे अजमावणे कठीण नाही. पुढे त्याच मुलाखतीत ‘इस्लामने तेराशे वर्षांपूर्वीच लोकशाही आणली' असे त्यांनी म्हटले आणि नंतर 'पाकिस्तानातून भारताने हिंदूंना बोलावल्यामुळे ते गेले' असे विधान केल्यावर 'मी माझ्या शब्दाप्रमाणे वागलो' असे म्हणायला ते नामानिराळे राहिले. समान नागरिकत्वाची त्यांनी दिलेली आश्वासने, इस्लामच्या न्यायावर परंपरागत पद्धतीने दिलेला भर, आणि अखेरीला पाकिस्तानातील हिंदूंच्या हकालपट्टीबद्दल त्यांना बोलावले म्हणून ते गेले' असा निर्लज्ज, जखमेवर मीठ चोळणारा त्यांना दिलेला दोष यातून जे जीना दिसतात ते इस्लामच्या परंपरागत चौकटीतील आहेत. मुस्लिम समाजाच्या वर्तनाचे मूल्यमापन करण्यासाठी आहे असे मुसलमान कधीही मानत नाहीत. न्याय, समता, लोकशाही इत्यादी सर्व आधुनिक कल्पना माणसांच्या वर्तनाच्या संदर्भात नव्हे तर इस्लामच्या परंपरागत वैचारिक चौकटीच्या संदर्भात ते सांगत असतात. 'आम्ही इतरांना समानतेने वागवू' या जीनांच्या वाक्याचा अर्थ 'इस्लामने नेहमीच सर्वांना न्यायाने वागविले आहे' या त्यांच्याच उद्गारांच्या संदर्भात वाचला पाहिजे. आणि मग जर मुसलमानांनी हिंदूंना हाकलले असेल तर इस्लाम हा न्यायीच आहे असे जीनांचे म्हणणे असल्यामुळे हिंदूंना बोलावल्यामुळे ते गेले हे त्यांचे विधान इस्लामिक न्यायाच्या वैचारिक कल्पनेच्या चौकटीत समजावून घ्यायला पाहिजे. वैचारिक न्यायाची कल्पना आणि मुसलमानांचे वर्तन यांच्यात विसंगती दिसत असेल तर ती विसंगती नाकारणे आणि मुसलमानांचे वर्तन चुकीचे आहे हे अमान्य करणे ही भूमिका सर्वच मुसलमान घेतात. ही स्वत:च्या वर्तनातील विसंगती दिसून आली असता आपल्या वर्तनाला वळण लावण्याची जबाबदारी ते कधी घेत नाहीत. जीना याला अपवाद नव्हते. या अर्थाने ते परंपरावादीच होते आणि जीनांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने तर या परंपरावादाचे स्वरूप श्री. श्रीप्रकाश यांना दाखविले. कराचीतील एका देवळावर मुस्लिम जमाव हल्ला करीत असताना श्रीप्रकाश यांना एका सरकारी समारंभाला जाताना पाहिले, त्या समारंभास एक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. श्रीप्रकाशांनी त्यांना दंगल होत असल्याचे सांगितले आणि पोलिस पाठविण्याची विनंती केली. यावर ते मंत्री उद्गारले, “पाकिस्तान हे इस्लामिक राज्य आहे. या राज्यात असे होऊच शकत नाही." या उत्तराने श्रीप्रकाश हतबुद्ध झाले. खरे म्हणजे इस्लामी राज्याची बदनामी करण्यासाठी हिंदूंच आपल्या देवळांचा विध्वंस करीत आहेत असे उत्तर ह्या मंत्रीमहाशयांनी दिले नाही याबद्दल श्रीप्रकाशांनी त्यांचे आभार मानणे आवश्यक होते. बहुधा

भारत - पाक संबंध/९१