पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होते. चौधरी रहिमतअलींनी प्रथमच हिंदू वर्चस्वाचा आपल्या पुस्तिकेत बागुलबोवा उभा केला. हाच मुद्दा पुन्हा पुन्हा जीनांनी भर देऊन सांगितला. इक्बालांची धार्मिक भूमिका आणि जीनांची भूमिका यांच्यात तसा फरक नाही. बहुसंख्यांक हिंदू कायदेमंडळाला मुस्लिम सभासदांच्या संमतीनेच कायदे करता येतील हा जीनांचा आग्रह होताच. मुस्लिम राज्याच्या कल्पनेचेच हे आधुनिक स्वरूप होते. सत्तेत हिंदूंबरोबर भागीदारी करायची त्यांची तयारी होती, इक्बालांची नव्हती. इतकाच काय तो दोघांच्या कल्पनेतील फरक होता. जीना समान, भागीदारीची भाषा करीत होते. इक्बालांनी ती कधी केली नाही. त्यांची विभक्तवादी भूमिका प्रथमपासून स्पष्ट होती. सरदार गुलख़ान, चौधरी रहिमतअली आणि इक्बाल ही माणसे अधिक प्रामाणिक आहेत. जीना हळूहळू त्यांच्या भूमिळेपर्यंत १९४० साली आलेच. परंतु त्यांनी पाकिस्तानच्या मागणीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी हिंदूंच्या अन्यायाचा बागुलबुवा उभा केला.
 हा बागुलबुवा खोटा होता हे त्यांनीच एके ठिकाणी वेगळे विधान करून मान्य केले आहे. बहुसंख्यांक मुस्लिम प्रांतांचे वेगळे राष्ट्र झाल्यानंतर उरलेल्या भारतातील मुसलमानांचे भवितव्य काय? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "मी देखील अल्पसंख्यांक प्रांतातीलच आहे. मुसलमान आपल्या धर्मनिष्ठेच्या बळावर कोठेही सुरक्षित राहू शकतात." याहीपेक्षा लियाकतअली खानांनी दिलेली कबुली अधिक महत्त्वाची आहे. "हिंदूंच्या वर्चस्वाच्या भीतीमुळे आम्ही वेगळ्या राष्ट्राची मागणी केलेली नाही. आम्हाला आमच्या कल्पनेनुसार आमचे सामाजिक जीवन घडविण्यासाठी वेगळे राष्ट्र हवे आहे." असे त्यांनी म्हटले आहे. (१४ - १५ डिसेंबर १९४७ ला भरलेल्या ऑल इंडिया मुस्लिम लीग कौन्सिलच्या कराची । येथील बैठकीत जीना म्हणाले, “६ कोटी जनतेचे प्रबळ व सार्वभौम पाकिस्तान दिले पाहिजे. भारतातील मुसलमानांना वाईट दिवस आले त्यामुळे माझे मन भरून आले आहे:माझा त्यांना असा सल्ला आहे की त्यांनी आपली संघटना उभारून सामर्थ्यवान व्हावे, म्हणजे त्यांचे हक्क सुरक्षित राहतील. अल्पसंख्य असले तरी चांगले संघटित झाले तर आपल्या राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक हक्कांच्या संरक्षणाचे सामर्थ्य त्यांना लाभेलच. पाकिस्तानची स्थापना हे लक्षावधी मुसलमानांच्या श्रमाचे फळ आहे. ज्यांना पाकिस्तानमुळे आता प्रगतीचा रस्ता सापडला आहे अशांची व जे आता भारतात आहेत त्या सर्वांनी मेहनत घेतली ह्याची पूर्ण जाणीव मला आहे.").

 आणि तरीही जीना आणि मुस्लिम लीगचे इतर नेते हिंदू वर्चस्वाची भीती दाखवीत राहिले, कारण त्याखेरीज मुस्लिम जनमत त्यांना आपल्या पाठीशी संघटित करणे शक्य नव्हते. पाकिस्तानची मागणी जीना मनापासून करीत नव्हते-त्यांना ही मागणी सतत पुढे करून अखंड हिंदुस्थानात जास्तीत जास्त सत्ता मिळविण्याचा सौदा करावयाचा होता, असा एक समज आहे. त्याला फारसा आधार नाहीच. अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता मिळत असेल तर त्यांना वेगळे पाकिस्तान नको होते. इतकाचं जीनांच्या भूमिकेचा खरा अर्थ आहे. कारण अखंड भारतातील पन्नास टक्के भागीदारी वेगळे पाकिस्तान मिळण्यापेक्षा अधिक

६८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान