पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केला तेव्हा लेडी मिन्टो त्यांना म्हणाल्या, 'तुम्ही ३३ टक्क्यांना का विरोध करता आहात? ४०% देऊ केले होते.” गांधीजी उत्तरले, "Gokhale was a big man. He could afford to commit big mistakes. I am too sinall. I can't do it." (लेडी मिन्टो डायरी.)) १९४० साली पाकिस्तानची मागणी पुढे आली. कारण स्वातंत्र्य दृष्टीच्या टप्प्यात आले होते. प्रत्येक राजकीय सुधारणेनंतर मुसलमानांच्या मागण्यांची कमान वाढत गेली आहे. वेगळे राष्ट्र मागण्यापूर्वी असलेल्या मागण्यांचे स्वरूप राष्ट्रांतर्गत राष्ट्र म्हणून मुस्लिम समाजाला दर्जा मिळवून देण्याचे राहिले आहे आणि जीनांच्या बदलत्या भूमिकेचे स्वरूप या राजकीय सुधारणांच्या संदर्भात चटकन लक्षात येते.

 पाकिस्तानची मागणी त्यांनी १९४० साली केली. त्याआधी १९३९ पासून मुस्लिम समाज हे एक राष्ट्र आहे असे ते म्हणू लागले होते. जीनांच्यात बदल कसा होत गेला? भारतीय एकतेचे ते आधी पुरस्कर्ते होते. मागाहून फाळणीचे पुरस्कर्ते का बनले? जीनांच्या या बदललेल्या भूमिकेभोवतीच हिंदू-मुस्लिम संबंधांचे आणि फाळणीच्या कारणांचे राजकीय विवेचन नेहमी होत राहिले आहे. जीनांच्या आधीच्या 'मामुली' मागण्या मान्य केल्या गेल्या असत्या तर फाळणी झाली नसती असे अनेक राजकीय टीकाकारांना सुचवावयाचे असते. ते हे लक्षातच घेत नाहीत की ऐतिहासिक संघर्षांच्या संदर्भात व्यक्तींच्या भूमिकांना फारसा अर्थ नसतो. जीना दुखावले म्हणून पाकिस्तान झाले, असे म्हणणारे हे समजून घेत नाहीत की जीना काँग्रेसमध्ये असताना आणि नंतर १९३८ पर्यंत लीगचे नेतृत्व करताना मुसलमान त्याच्या मागे नव्हते. जीना दुखावले गेले असे म्हणणाऱ्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. जाना मुसलमान असल्यामुळे त्यांची चुकीची भूमिकादेखील मान्य करावयाला हवी होती असा याचा दुसरा अर्थ होतो. हे हास्यास्पद आहे. कारण त्यांच्यापेक्षा अतिरेकी भूमिका घणारा दुसरा नेता निर्माण झालाच असता. जीना दुखावले गेले आणि त्यांनी फाळणीचा पुरस्कार केला असे मानले तर जीना हे क्षुद्र होते असेच त्यामुळे सिद्ध होते. कारण जीनांना दुखावणे म्हणजे मुसलमान समाजाला दुखावणे नव्हे. शिवाय जीना मुसलमानांचे तेव्हा एकमुखी नेतेही नव्हते आणि काँग्रेसचे नेते मुसलमान समाजाविरुद्ध नव्हते. राजकारणात अनकाच अनेकांशी पटत नाही. सर्वांशी जुळवून घेणे शक्यच नसते. काही माणसे सकारण कला अकारण दुखावली जातातच. सुभाषबाबू दुखावले गेले, डॉ. खरे दुखावले गेले, डॉ. आंबेडकर दुखावले होतेच आणि अगदी अलीकडचे राजाजी नेहरूंकडून दुखावले गेल्याच्या वदंता प्रचलित होत्या. यांपैकी डॉ.खऱ्यांनी काँग्रेसमधून काढून टाकल्यानंतर हिंदू जातीयवादी कारण केले, परंतु हिंदू त्यांच्यामागे गेले नाहीत. सुभाषबाबूंनी बंगाली प्रदेशवादी राजकारण माधाजीशी आपले मतभेद तत्त्वांबाबतचे आहेत असे ते सांगत राहिले. गांधीजी आहत अशी असत्य संकचित भूमिका त्यांनी कधी घेतली नाही. आंबेडकरांनी कराराला मान्यता देऊन गांधींजींना उपोषणाच्या दिव्यातून बाहेर काढले. त्यांनी काँग्रेसप्रणीत राष्ट्रवादाविरूद्ध लढाई खेळण्याचे कधी मनात आणले नाही आणि राजाजींनी हिंदीचा प्रश्न पता सकुचित प्रातवादी भूमिका घेतली नाही. या साऱ्यांच्या वागण्याच्या आणि त्याच्या परिणामांच्या संदर्भात जीनांचे वर्तन आणि त्याचे परिणाम वेगळे दिसतात. जीना काँग्रेसमधून

५४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान