पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


बळजबरीने धर्मांतर केलेल्यांना परत सन्मानपूर्वक मुसलमान म्हणून जगण्याची संधी मिळाली पाहिजे." असा आग्रह फाळणीच्या त्या वादळी, माणसाच्या मूलभूत निष्ठा हादरवून टाकणाऱ्या घटनांच्या काळातून, ते म्हणत राहिले. अखेरीला त्यांनी मुसलमानांच्या संरक्षणासाठी प्राणांची बाजी लावली. मुसलमान समाजात अशी मानवतावादी व्यक्ती कोणती दाखवायची? मी तिच्या शोधात आहे.
 या उदारमतवादाचा मुसलमान समाजाने आपल्या टोळीच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला आहे. मुसलमान समाजात निराद चौधरी नाहीत, नेहरू नाहीत, यदुनाथ सरकारदेखील नाहीत, मार्टिन ल्यूथर नाहीत आणि विल्यम् शिररही नाहीत. मात्र त्यांच्या स्वत:कडे पाहावयाच्या चिकित्सक दृष्टीचा आपल्या टोळीवाल्या ध्येयप्रणालीच्या प्रचारयंत्रणेसाठी वापर करण्याचे कौशल्य मुसलमान विचारवंतांनी दाखविले आहे. मुसलमान लेखक स्वत:च्या धर्माची चिकित्सा करीत नाहीत, ती इतरांनी करू नये अशीही त्यांची अपेक्षा आहे. मात्र इतरांच्या धर्मश्रद्धेवर टीका करण्याचा आपल्याला हक्क आहे अशीही त्यांची भूमिका असते आणि हा हक्क हिंदू आणि ख्रिश्चन लेखकांनी केलेल्या आपल्या समाजावरील टीकेचा दाखला देऊन ते बजावीत असतात. जी. ई. व्हॉन ग्रुनबॉम यांनी आपल्या 'मॉडर्न इस्लाम' या पुस्तकात दिलेली एक तळटीप मुसलमानांच्या या मनोवृत्तीवर नेमका प्रकाश टाकते. १८६० साली कायरो येथे झालेले जुरजी झैदान आणि सलमा मुसा यांच्यातील संभाषण त्यांनी उद्धृत केले आहे. सलमा मुसा हे जुरजी झैदानला विचारतात, "आपण ख्रिश्चन धर्मावर टीका करू शकतो का?" जुरजी झैदान उत्तर देतात, “होय, कारण ख्रिश्चनांनीच ख्रिश्चन धर्मावर टीका केलेली आहे." सलमा मुसा पुढे विचारतात, “आपण इस्लामवर टीका करू शकतो का?" जुरजी झैदान यावर उत्तर देतात, “नाही. कारण कोणीही मुसलमानाने इस्लामवर अजून टीका केलेली नाही."
 आपल्या 'Acculturation and Literature' या प्रकरणात गुनबॉम पुढे विचारतात,

 "Is it a matter of phrasing, or of a permanently different orientation of the individual to himself and his society, which has so far deprived the Arab world of works like Nehru's Autobiography (1936) or, more charecteristic still; the Autobiography of an Unknown Indian (1951) by the Bengali Nirad C. Chaudhari (b. 1898)? Nehru, and especially Chaudhari, who has no political public to hold, know who they are and how they have, as it weres acquired their present selves. Neither obscures his psychological finesse by literary mannerisms, Chaudhari refrains completely from pleading a cause or preaching a gospel. Both are aware that their society is in transition and that, in a sense, they are walking on quicksand. Yet they are certain of their identity, certain also of its elements, their origin and growth and the aspirations that give them cohesiveness and unity. Could it be that a touch of doubt about their cultural identity is still preventing the Arabs from realising the collective self - perception, the analytical plausibility of the Indians, whose sensibilities, too, had been sharp-

४८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान