पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विचारताच शौकतअलींनी अहवाल लिहून दंगलीचे खापर हिंदूंच्या माथ्यावर फोडले. गांधीजी यामुळे दिङ्मूढ झाले. (गांधीजींनी धर्मनिरपेक्ष मुसलमानी नेतृत्व दुबळे केले असे म्हणणाऱ्यांनी या दंगलींचा निषेध या तथाकथित धर्मनिरपेक्ष मुसलमान नेत्यांनी केल्याचे उदाहरण दाखवले तर बरे होईल. जीनांनीदेखील या दंगलींचा निषेध केलेला नाही. ते तेव्हा मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते. या दंगलींसंबंधी काँग्रेस, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या तिन्ही पक्षांच्या कार्यकारिणीने केलेले ठराव या पक्षांच्या जातीय प्रश्नाकडे पाहण्याच्या प्रवृत्तीवर पुरेसा प्रकाश टाकणारे आहेत. काँग्रेसने दोन्ही जमातींना दोष दिला. हिंदू महासभेने झाल्या प्रकाराबाबत कोहारच्या मुसलमानांना अधिक जबाबदार धरले आहे. तथापि हिंदुना दोषातून मुक्त केलेले नाही. मुस्लिम लीगने मात्र मुसलमानांचा काहीच दोष नाही असा निर्वाळा दिला असून दंगलींचे खापर सर्वस्वी हिंदूंवर फोडले आहे. (पहा - Indian Muslims' by Ram Gopal.)
 मलबार आणि कोहार येथे दंगलींतून सक्तीची धर्मांतरे झाली होती. या दुर्दैवी लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचा प्रश्न उपस्थित झाला. आर्य समाजाने आणि विशेषत: पं. मदनमोहन मालवीय यांनी याकरिता शद्धीचळवळ हाती घेतली. परंतु जवळजवळ सर्व मुसलमान नेत्यांनी शुद्धीचळवळीस विरोध केला. मुसलमान समाजात तबलीग आणि तन्झिम या 'शुद्धी' आणि 'संघटन' ह्या चळवळींसारख्याच चळवळी अस्तित्वात होत्या. या दोन्ही चळवळींत तणाव निर्माण होणे अपरिहार्य होते. शुद्धी आणि तबलीगचे प्रश्नावर दोन्ही समाजांच्या नेत्यांच्या भूमिका वेगळ्या दिसून येतात. तबलीग आणि तन्झिमचे आंदोलन मुस्लिम समाज करणार नसेल तर शुद्धीचळवळ आपण करणार नाही अशी समंजस भूमिका सावरकरांसारख्या । हिंदुत्ववादी नेत्याने घेतली होती. (पहा - सावरकर वाङ्मय) तथापि मुसलमान नेत्यांच्या मते तबलीग हा मुसलमानांचा हक्क आहे आणि हिंदूंनी त्यांना विरोध करणे चूक आहे. डॉ. सैफुद्दिन किचलू यांनी तर १९२५ साली लाहोर येथे झालेल्या एका जाहीर सभेत "हिंदंनी तन्झिम चळवळीला विरोध केल्यास आम्ही अफगाणिस्तानसारख्या इस्लामी देशाचे साहाय्य घेऊन भारतावर मुस्लिम सत्ता प्रस्थापित करू" अशी धमकी दिली. (पहा - Indian. Muslims':by Ram Gopal. पृष्ठ १६५ - १६६) जमायत-ए-उलेमा ही. उलेमांची संघटना खिलाफत चळवळीतून स्थापन केली. १९१९ साली अमृतसर काँग्रेसबरोबर जमायतए-उलेमाचे अधिवेशन झाले. धार्मिक भूमिकेतून ब्रिटिशविरोध पुढे संघटितपणे चालविण्याचे कार्य आता सुरू झाले. काँग्रेसबरोबर जे मुस्लिम गट अखेरपर्यंत राहिले त्यांतील जमायत-एउलेमा ही संघटना एक प्रमुख होय. अहरार हा असा दुसरा गट होता. अहरार प्रथम जमायतए-उलेमामध्येच होते. मागाहून ते फुटून बाहेर पडले व अहरार या नावाने त्यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. मौ. अताऊल्लाशहरा बुखारी हे अहरारांचे नेते होते. जमात-एइस्लामचे मौलाना मौदुदी हेदेखील प्रथम जमायत-ए-उलेमा या संघटनेतच होते. मतभेद होऊन ते बाहेर पडले व मागाहून त्यांनी जमात-ए-इस्लामीची स्थापना केली. धर्मप्रेरणांच्या आधारे राजकारणात उतरलेला 'खाकसार' हा आणखी एक गट होता.

 खाकसार संघटनेची विचारसरणी थोडी वेगळी आहे. या संस्थेचे संस्थापक डॉ.

३२/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान