पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/27

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


तोंड द्यावे लागले. आसाममध्ये अनेकदा अहोमराजांनी मोगलांचे पराभव केले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुसलमानी सत्ता इतकी दुबळी ठरली होती की धर्मप्रसाराचे उद्दिष्ट साधणे अशक्य होऊन बसले. भारताचा स्पेन झाला नाही, तथापि अफगाणिस्तानही होऊ शकला नाही. या विशिष्ट इतिहासाचे खोल ठसे हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजांच्या मनांवर उमटलेले राहिले. भारत इस्लाममय करण्याची प्रक्रिया अपूर्ण राहिली. या जाणिवेने धर्मनिष्ठ मुसलमानी मने भारली गेली. या जाणिवेतूनच पुढे आधुनिक इतिहासातदेखील मुसलमानी धार्मिक चळवळींनी जन्म घेतला, तर स्पेनप्रमाणे इस्लामची ही लाट आपण परतवू शकलो नाही ही खंत हिंदुत्ववादी चळवळींना जन्म देणारी ठरली.

◼️

२६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान