पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रमाण फक्त २५ टक्क्यांएवढे राहिले आहे. एवढा प्रदीर्घ काळ सत्ता असताना देशातील बहुसंख्यांक लोक मुसलमान न झालेला भारत हाच एक अपवाद असलेला देश आहे.
 याची कारणे अनेक होती. एक तर भारतातील मुसलमानांची सत्ता क्रमाक्रमाने विस्तार पावली. अकबराच्या उदयापर्यंत सर्व भारत मुसलमानी सत्ताधीशांच्या एकछत्री अंमलाखाली आलाच नव्हता. मोरोक्को ते अफगाणिस्तान एवढ्या प्रचंड प्रदेशात तेव्हा असलेल्या लोकसंख्येहून कितीतरी अधिक लोकसंख्या मुसलमानी राजवटीच्या अंमलाखाली आली. तिचे वेगाने धर्मांतर करून घेणे ही जवळजवळ अशक्य बाब होती. या बाबतीत अल्तमशच्या वजिराने हिंदूंचे धर्मांतर करून घेण्याच्या उलेमांच्या मागणीला दिलेले उत्तर सूचक आहे. तो म्हणतो;
 "हा देश नुकताच आपण जिंकला आहे आणि मुसलमानांची संख्या एका मोठ्या भांड्यात टाकलेल्या चिमूटभर मिठाएवढी आहे. हिंदूंना'इस्लाम स्वीकारा किंवा मृत्यूला तयार व्हा' हा हुकूम आत्ता दिल्यास भयंकर परिस्थिती उद्भवेल आणि मुसलमान एवढे थोडे आहेत की ते हिंदूंना दडपू शकणार नाहीत. मात्र काही वर्षांनी राजधानीत, इतर प्रदेशात मुसलमान चांगले स्थायिक झाले आणि सैन्याची संख्या वाढविली की हिंदूंना इस्लाम स्वीकारा किंवा मृत्यूला तयार व्हा असे सांगणे शक्य होईल.” (उतारा : निझामींचे पुस्तक.)
 अकबराच्या काळात खऱ्या अर्थाने राज्यविस्तार झाला. राज्याच्या विस्ताराबरोबरच सरकारी नोकरवर्ग आणि सैन्य प्रचंड प्रमाणात वाढले. फार मोठ्या प्रमाणात हिंदूंचा सैन्यात आणि सरकारी राज्ययंत्रणेत शिरकाव झाला. अकबराचे उदारमतवादी धोरणही याला बऱ्याच प्रमाणात साहाय्यभूत ठरले. (या काळातदेखील हिंदूं अधिकाऱ्यांचे राज्ययंत्रणेतील प्रमाण १५% एवढे होते. भारतीय मुसलमान अधिकाऱ्यांचेदेखील प्रमाण १५% च होते. सत्तर टक्के वरिष्ठ अधिकारी वर्ग इराण आणि मध्य आशिया येथून आयात केला जाई.) (प्रा. महंमद यासीन यांचे पुस्तक.) त्याने जिझिया रद्द केले आणि हिंदूंना कारभारात स्थान दिले. त्यामुळे, तसेच धर्माकडे पहावयाच्या त्याच्या विशाल दृष्टीमुळे इस्लामच्या विस्ताराची प्रक्रिया मंदावली. पुढे औरंगजेबाने हा क्रम पुढे रेटण्याच्या अट्टहासाने प्रयत्न केला तरी त्याला यश आले नाही. एकतर अकबराचे धोरण संपूर्णपणे बदलणे सैन्य-दलातील आणि कारभारातील हिंदूंच्या अस्तित्वाने शक्य झाले नाही. (औरंगजेबाबरोबर दक्षिणेच्या स्वारीवर आलेल्या मोगलांच्या सैन्यातील हिंदूंचे प्रमाण पंचाहत्तर टक्के तरी असावे.) अनेक ठिकाणी त्याच्या दरबारातील सामर्थ्यवान राजपूत आणि इतर सरदारांनी आपल्या आधिपत्याखालील राज्यांत जिझिया न लादण्याची सवलत मिळविली. या सरदारांना काढून टाकणे शक्य नव्हते. त्यांच्यावाचून एवढे प्रचंड सैन्य उभेच राहू शकले नसते.

 दुसरे असे की हिंदूंचा प्रतिकार सुरू झाला. येथे एक गोष्ट चटकन लक्षात येते ती अशी की, बहुसंख्यांक हिंदूंनी अत्याचार सहजासहजी सहन केलेले नाहीत. अकबराच्या सहिष्णू धोरणांशी त्यांनी जुळते घेतले, तर औरंगजेबाच्या धार्मिक असहिष्णुतेला आव्हान दिले. या प्रतिकाराची नीट दखल घेतल्यास धर्मविस्तार अधिक का झाला नाही हे समजून येते. मराठे,जाट आणि शीख यांच्या कडव्या प्रतिकाराला याच काळात भारतातील मुसलमानी सत्तेला

भारतीय इस्लाम /२५