पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/209

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रेषित महंमदांने घोषित केलेल्या समतेमुळे मुसलमान आर्थिक समतेचा विचार करावयास अपात्र ठरले आहेत. एका प्रकारे इस्लामिक समता ही आर्थिक समता येण्याबाबतीतील अडथळा बनली आहे.
 भारतीय कम्युनिस्ट चळवळ तूर्त पूर्णपणे विस्कळीत बनलेली आहे आणि मुसलमान समाज कम्युनिस्टांकडे आकर्षित होण्याऐवजी मुस्लिम जातीयवादी पक्षाच्या झेंड्याखाली गोळा होण्याचा प्रयत्न करीत आहे. कम्युनिस्टांच्या गेल्या अठ्ठावीस वर्षांच्या मुस्लिमविषयक धोरणाचे हे फलित आहे.













२०८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान